विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ, भद्रावती ठरला चषकविर
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूरचे आयोजन
भद्रावती : कोरोणा प्रादुर्भावाचे दोन वर्षे संचारबंदी व कार्यक्रमबंदी मधे गेल्याने खेळाडू मैदानापासून दूर गेले होते. मात्र प्रथमच भद्रावती शहरांमध्ये भव्य स्वरुपात राष्ट्रीय व क्षेत्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून घेण्यात आल्या. यामध्ये काल (दि.१४) ला रात्री उशीरा कै. म. ना. पावडे भव्य कबड्डी चषक सामने संपन्न झाले. यावेळी झालेल्या पारितोषिक सोहळ्यात बोलतांना रवि शिंदे म्हणाले की, या जिल्ह्यात सहकार क्षेत्राचा पाया घालणारे माजी आमदार म.ना. पावडे यांचे पासून युवकांनी कार्यरुपी प्रेरणा घ्यावी, आजच्या पिढीला त्यांचे नाव व कार्य माहित नाही, त्यामुळे त्यांच्या स्मृती जागवीता याव्या, करीता त्यांच्या नावाने कबड्डी चषक घेण्यात आले आहे. व यापुढेही घेत राहू.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष रवि शिंदे, कार्यवाहक धनराज बहादे, माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष नागो बहादे, ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक देहारकर गुरुजी, भद्रावती पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष विनायक येसेकर, सचिव संदीप जीवने, दिलीप ठेंगे, दिलीप मांढरे, प्रा. रविकांत वरारकर, पोमेश्वर टोंगे, राजू गैनवार, अतुल कोल्हे, निलेश नवराते, उमरे बाबू, डॉ. नब्बु, विश्वास कोंगरे, अक्षय बंडावार, संदीप पाचाभाई, निलेश बांदुरकर, अभय टोंगे, नितेश खरवडे आदी उपस्थित होते.
कै. म. ना. पावडे भव्य कबड्डी चषकात वरोरा व भद्रावती तालुक्यातील एकूण ४० संघ सहभागी झाले होते. त्यामधे अंतिम सामन्यात माँ भवानी क्रीडा मंडळ, खांबाडा व विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ, भद्रावती हे संघ पोहोचले. या दोन्ही संघात चुरशीचा सामना झाला व त्यात विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ, भद्रावती हा संघ विजयी झाला.
सामन्यांअंती भद्रावती पत्रकार असोसिएशनच्या पदाधिकारी तर्फे बक्षीस वितरण पार पडले. यात बेस्ट रेडर सचिन राऊत, बेस्ट डीफेंडर निखिल राऊत, ऑल राऊंडर अजय काकडे, लोकांचा आवडता खेळाडू योगेश काकडे यांना सन्मान चिन्ह व रोख पारितोषिक देण्यात आले. तर सामन्याचा पहिला विजयी संघ विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ, भद्रावती, दुसरा विजयी संघ मां भवानी क्रीडा मंडळ, खांबाळा, तर तिसरा विजयी संघ स्वामी विवेकानंद क्रीडा मंडळ, मोहाबाळा यांना रोख रक्कम, सन्मानपत्र व शिल्ड भेट देण्यात आली. पंच सुरेश मुत्तमवार, हिमांशू कन्नाके, सौरभ मेश्राम, शुभम चनकापुरे यांचाही सत्कार करण्यात आला.
या चषकात डॉ. नब्बु दाते, अमोल रोडे, सचिन ढवस, सचिन वावरदडपे, संदीप कल्लो, अनिल पढाल, विजय भानारकर, आकाश ढवस, मंगेश निखारे, अजय काकडे, आकाश राऊत, अजीम शेख, निखिल कुलदीप, रोहित रोहित तेलसे, करण बावणे आदींनी व्यवस्थापन मंडळ म्हणून भूमिका बघितली.
सामान्यांची कॉमेंट्री व संचालन रविकांत वरारकर तथा नब्बु दाते यांनी केली. बऱ्याच काळानंतर झालेल्या कबड्डी सामान्यांना बघण्याकरीता क्रीडाप्रेमींची एकच गर्दी झालेली होती.