भद्रावती : श्रध्देय बाबा आमटे यांनी १९८६ मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान भारत जोडो अभियान राबविले. या अभियानात देशाच्या कानाकोपऱ्यातून जनता सहभागी झाली होती . यामुळे भारत जोडो अभिमानातून देश भक्ती व देशप्रेम जागृत झाले देशाची एकात्मता व अखंडतेला मदत झाली. भद्रावतीत दि. १३ ते १६ आँक्टोंबर २०२२ या कालावधीत स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यमाने देशपातळीवरील पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपचे आयोजन केले आहे.
याचॅम्पियनशिप मध्ये देशाच्या विविध प्रान्तातून सुमारे सहाशे पॉवर
लिफ्टिर्स सहभागी झाले आहे. यानिमित्याने सहभागी सर्व पॉवर लिफ्टिर्स एका छताखाली आल्याने त्यांच्यात विचारा ,आचार व संस्कृतीची देवाणघेवान होऊन राष्ट्रीय एकात्मता द्दढ होण्यास मदत होईल. यामुळे सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी आयोजित केलेल्या या देशपातळीवरील पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमधून श्रध्देय बाबा आमटे यांच्या भारत जोडो अभियानाचा प्रत्यय येतो . असे प्रतिपादन वरोरा येथील महारोगी सेवा समिती, आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी केले. याप्रसंगी डॉ. विकास आमटे यांनी सहभागी पॉवर लिफ्टिर्स सोबत सुसंवाद साधला.
स्थानिक गौरी लॉन येथे आनंदवन परीवारांकडून सुमधूर संगीतमय स्वरानंदवन सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. विकास आमटे यांच्यासह आनंदवनाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय पोळ, विश्वस्त सुधाकर कडू, ज्येष्ठ कार्यकर्ते कवीश्वर यादव, कार्यकारी सहाय्यक राजेश ताजने यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे, सुषमाताई शिंदे, धनराज आस्वले व प्रा.रविकांत वरारकर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. विकास आमटे यांनी रविंद्र शिंदे यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. तसेच भद्रावतीच्या शिंदे परीवाराशी असलेल्या ऋणानुबंधाला उजाडा दिला.
[ – नॅशनल पॉवर लिफ्टिर्सची दुबई येथील इंटरनॅशनल चॅम्पियनशिपसाठी झुंज –
भद्रावती येथे आयोजित नॅशनल सिनियर अँड मास्टर्स क्लासिक पॉवर लिफ्टिंग नंतर दुबई येथे इंटरनॅशनल चॅम्पियनशिप होणार आहे. दुबई येथील चॅम्पियनशिपमध्ये संपूर्ण जगातून पॉवर लिफ्टिर्स सहभागी होणार आहे. भद्रावती येथील नॅशनल चॅम्पियनशिपमधून सर्वोच्च ठरणारे पॉवर लिफ्टिर्स दुबईच्या इंटरनॅशनल चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरणार आहे. यामुळे येथील संपूर्ण पूरूष व महिला पॉवर लिफ्टिर्स आपआपली शक्ती पणाला लावून झुंज देत असल्याचा प्रत्यय येत आहे.