चंद्रपूर :- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा नुकताच चंद्रपूर जिल्हा दौरा झाला. दौऱ्या दरम्यान भाजपाच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत ज्यांचा कधीही राजकारणात सहभाग नव्हता.ना कधी काँग्रेसचे वा भाजपाचे काम केले. मुळात यांचा राजकारणाशी कवडीचाही संबंध नाही.असे गोडपिंपरीचे प्रतिष्ठित व्यापारी राहुल चौधरी याना गोंडपिपरी मधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांच्या दौरा कार्यक्रमात त्यांचा भाजपात प्रवेश करवून घेतला.आणि काँग्रेसला खिंडार अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमी पसरवली. त्यातून तालुका भाजपा फाजील समाधान करून घेत आहे.
राहुल चौधरी हे गोंडपिपरी तालुका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाजार समितीचे सभापती सुरेश चौधरी यांचे चिरंजीव आहे. त्यांचा व्यवसाय व्यापार आहे. राजकीय दृष्टिकोनातून सपशेल विरोधात्मक असून स्वतः त्यांनी कधीही काँग्रेस पक्ष वाढीसाठी, तालुका काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन सहकार्य केलेलेच नाही. आणि त्यांना यापूर्वी स्वतःचे वडील राजकारणात आहे म्हणून कधी राजकीय मुद्द्यावर त्यांनी राजकारणाचा रस घेतलेला नाही. राहुल चौधरी यांच्या भाजपा पक्षप्रवेशामुळे गोंडपिंपरी तालुका काँग्रेसला कुठलाही फरक पडलेला नसून, तालुक्यातील भाजपा कमेटी राहुल चौधरीं च्या भाजपा पक्षप्रवेशाला काँग्रेसला खिंडार म्हणवून घेत आहे. ही भाजपाची फाजील समाधानी आहे . सुरेश चौधरी यांची कारकीर्द आणि सहकार्य सतत काँग्रेसलाच राहिलेले असून त्यांचे कार्य आमदार सुभाष धोटे यांचेसाठी तालुक्यात खंबीर नेतृत्वाच राहिलेलं आहे.सुरेश चौधरी हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असून गोंडपिपरी तालुक्यातील काँग्रेस पक्ष वाढीसाठी ते सतत झटत असतात. त्यांच्यासोबत तालुक्यातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा काँग्रेस पक्ष वाढीसाठी आणि काँग्रेसची उत्तम कार्यप्रणाली जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत सहकार्य करत असतात. राहुल चौधरी याच्या भाजपा पक्ष प्रवेशामुळे गोंडपिपरी तालुक्यातील काँग्रेसला तिळमात्र सुद्धा फरक पडलेला नाही.असे मत काँग्रेस तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे व्यक्त केले आहे.