भद्रावती: गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी बहुल क्षेत्र असल्यामुळे येथील खेळाडूंमध्ये स्पोर्टचे नॅचरल जिन्स आहेत. आणि मी ऑर्थोपेडिक सर्जन आणि स्पोर्टस सायन्स या विभागांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर असल्यामुळे या खेळाडूंना प्राविण्यप्राप्त करण्यासाठी माझी भरपूर मदत मिळेल असे विचार डॉ. सागर वझे यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात आपली पदवीधर मतदार निवडणूक संदर्भात आपली भूमिका मांडत होते. यावेळी मंचावर वाणिज्य विभागप्रमुख डॉ.
विजय टोंगे, ग्रंथालय विभागप्रमुख डॉ. सुधीर आष्टुनकर, कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.नरेंद्र लांबट विराजमान होते.पुढे बोलताना डॉ
वझे म्हणाले की, प्रत्येक विद्यापीठांमध्ये रिसर्च सेंटर असायला पाहिजे. जिथे भारतातील मोठमोठ्या कंपन्या आपले रिसर्च करून तेथील विद्यार्थ्यांना रिसर्च कामात उपयोगी आणून पुढे नोकरीच्या संधी प्राप्त होतील. तसेच स्किल लेबर तयार करण्यासाठी विद्यापीठात प्रॅक्टिकल स्किल एज्युकेशन दिले तर त्यांना नोकऱ्या मिळायच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज दिल्यामुळे पुस्तकी ज्ञानापेक्षा जास्त उपयोगी पडेल असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन इंग्रजी विभागातील प्रा. मोहित सावे यांनी मांडले.