चंद्रपूर- :- एप्रिल महिन्यापासून रस्त्याच्या कामामुळे ,विलगीकरन च्या मुद्यामुळे सर्व बससेवा बंद होत्या नंतर पूर्ववत सुरू झाल्या परंतु चंद्रपूर-लाठी बससेवा बंदच राहिली.
चंद्रपूर ते लाठी सकाळी ९ वाजता तर दुसरी फेरी सायंकाळी ४ वाजता असायची पण बंद झालेली सेवा एप्रिल पासून बंद असल्याने नागरिकांना व विध्यार्थ्यांना मोठा फटका बसला.लाठी हे गाव तेलंगणा -महाराष्ट्र सीमेवर टोकावर असून आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सदर बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी माजी जी प सदस्य अमर बोडलार यांनी पाठपुरावा केला असुन शनिवार पासून लाल परी लाठी – चंद्रपूर मार्गावर धावणार असून नागरिकांनी माहिती मिळताच समाधान व्यक्त केले