कोरची : गडचिरोली प्रशासन व गडचिरोली जिल्हा पोलीस अंतर्गत गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक सोमय मुंढे यांच्या संकल्पनेतुन व उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांचे मार्गदर्शनाखाली “पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत १७ जुलै रविवारला जिवन आवश्यक वस्तु वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मागील आढवड्यापासुन मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे पोलीस मदत केंद्र बेडगाव हद्वितील निराधार, वयोवृद्ध नागरीकांना काही भागात पुरस्थिती निर्माण झाली असल्याने त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या महीलांचे पती मरन पावले आहेत वयोवृद्ध आजी आजोबांना मुल बाळ नाहीत किंवा मुले सांभाळत नाहीत अशागरजु नागरीकांना पोलीस मदत केंद्र बेडगाव अंतर्गत जिवन आवश्यक वस्तुचे वाटप करु असे बेडगाव चे अधिकारी व अंमलदार तसेच एसआरपीएफ ग्रुप ०५ दौंड चे अधिकारी व अंमलदार यांनी संकल्प केला.
त्या अनुशंगाने पोलीस मदत केंद्र, बेडगाव येथिल अधिकारी व अंमलदार तसेच एसआरपीएफ ग्रुप ०५ दौंड चे अधिकारी व अंमलदार यांची मदत घेऊन उपरोक्त गावातील गरजु नागरीकांना पोलीस मदत केंद्र बेडगाव येथे बोलावुन एकुण २७ कुटुंबाला प्रत्येकी १० किलो तांदुळ,०३ किलो गहू, १ किलो दाळ, १ किलो सोयाबिन तेल, १ किलो मीठ पुडा, १ किलो साखर, १ पॅकेट चहा पत्ती, १ किलो बेसन पॅकेट १ पॅकेट मसाला, १ किलो सोयाबिन वडी, १ ड्राप अशा एकुण १५ प्रकारचे साहीत्यकीट वाटप करण्यात आले.
तसेच गरजु व्यक्तींनी पोलीस मदत केंद्र बेडगाव येथे संपर्क साधावा जमेल तशी मदत करु असे पोउपनि अनिल नाणेकर प्रभारी अधिकारी पोलीस मदत केंद्र बेडगाव यांनी आश्वासन दिले. सर्व हजर गरजु नागरीकांना गडचिरोली पोलीस प्रशासना बद्धल कृतघ्नता व्यक्त केली तसेच जिनव आवश्वक वस्तु वाटप करत असतांना त्यांचे डोळ्यात आनंदाचे अश्रु भाव दाटुन आले.
यावेळी बेडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी अनिल नानीकर, पोलीस उपनिरीक्षक प्रबोधन जोंधळे, एस आर पी एफ पोलीस उपनिरीक्षक मंडल साहेब, पोलीस कर्मचारी तसेच पोमके बेडगाव हद्वितील पोलीस पाटील व ३० ते ३५ नागरीक उपस्थित होते. सर्वांना चहापान करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.