सह्याद्रीचा राखणदार
चिमूर :- तालुक्यातील आंबोली येथील माणिकराव गुडधे यांच्या शेतातील विहिरीत चक्क साडेसहा फूट साप आढळला .त्या सापाला सुखरूप पकडून जीवनदान देण्यात आले .
याबाबत सविस्तर वृत्त असे की माणिकराव गुडधे यांचे शेत गावालगत आसोला रोड वर आहे, २९ जूनला सकाळी ते शेतीवर गेले व काही कामानिमित्त विहिरी कडे गेले तेव्हा त्यांना विहिरीत भला मोठा नाग असल्याचे निदर्शनात आले. त्यांनी लगेच याची माहिती शंकरपूर येथील सर्पमित्र सोहेल शेख व अभि चंदनखेडे यांना दिली, सर्पमित्रांनी जरा ही विलंब न करता गुडधे यांचे शेत गाठले व अतिशय शिताफीने त्या नागाला विहिरी बाहेर काढले, सापाची लांबी बघून सर्पमित्र ही अचंभीत झाले, कारण या नागाची लांबी चक्क साडे सहा फूट होती.
शेतकऱ्याने सर्पमित्राचे आभार मानले त्यानंतर या सापाला संरक्षित वनात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले यावेळी सर्पमित्र नितीन बैस, सोहेल शेख, अभि चंदनखेडे, रितेश गजभे, राहुल सुरणकर, मंगेश बारेकर व साहिल शेख उपस्थित होते.