कोरची :- कोरची शहरात दोन दिवसापूर्वी एकाच रात्रीला पाच ठिकाणी चोरी करणाऱ्या त्या चोराला कोरची पोलिसांनी २२ जूनला सायंकाळी पकडले . मागील काही आठवडाभरापासून कोरचीमध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट सुरु असून या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी कोरची पोलीस सज्ज झाली आहे.
कोरची शहरातील महावितरण कार्यालयासमोरील वार्ड क्रमांक पाच मध्ये भाड्याने राहत असलेल्या पाच जणांच्या घरांमध्ये या चोरट्यांनी रविवारच्या रात्रीला डल्ला मारत जवळपास दोन लाखाचा ऐवज लंपास केला होता. याबाबद कोरची पोलीस ठाण्यातमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासामध्ये चोरी झालेल्या इमारतीच्या बाजूला दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरेत चोरट्यांचा व्हिडिओ समोर आला होता त्या आधारावर कोरची पोलिसांनी त्यामधील एका चोरट्याला गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून नवरगाव जंगल परिसरात पकडले आहे त्या आरोपीचे नाव रुपेश सिडाम असे असून हा कोरची येथीलच रहिवाशी आहे तर दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध घेणे सुरू आहे.
या चोराला अटक केल्यानंतर चोरी गेलेला सामान याने राहत्या घराच्या बाजूला पडक्या घराच्या मागे लपवून ठेवला होता त्यामध्ये दोन लॅपटॉप,दोन एलईडी टीव्ही, सोळा जीबी पेन ड्राइव, दोन डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट डिवाइस,रोख रक्कम,सोन्याची विविध प्रकारच्या वस्तू,सुटकेस तसेच घरातील विविध प्रकारच्या वस्तू पकडून लाखो रुपयांचे समान पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्यामुळे चोरी करणाऱ्या भुरट्या चोरांचे धाबे दणाणले आहे.
सदर तपास कोरची पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक आशावरी शेडगे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी पोलीस हवालदार तेजराम मेश्राम पोलीस शिपाई धर्मेंद्र कोलते, सतीश नाटेकर, रंजीत उईके, देवराव पटले, नायक महिला पोलीस शिपाई सुष्मा गावडे हे करीत आहेत.सदर आरोपीला कुरखेडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे