देसाईगंज:- देसाईगंज येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत रात्री दोन ते तीन वाजता दरम्यान एटीएम मशीन तोडण्याचा प्रयत्न केला मात्र रक्कम काढता न आल्याने मशीन व डिस्प्ले बोर्ड तोडफोड करून पळून गेले. यामुळे देसाईगंज शहरातील पोलीसांच्या रात्रपाळी गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार देसाईगंज शहरात बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या लागूनच असलेल्या कब्रस्तानात बायपास रोडवर बँक ऑफ इंडिया ची शाखा मुख्य बाजारपेठेतुन तीन वर्षांपूर्वी स्थानांतरित झाली होती. ही शाखा शहरातील मुख्य मुख्य बाजारपेठेच्या प्रवाहाबाहेर असल्याने असुरक्षित वाटत होते. नेमकी हीच बाब हेरून चोरांनी दि १७ ला रात्री उशिरा दोन ते तीन वाजता दरम्यान एटीएम मशीन चे शटर तोडुन दर्शनी भागाचा काच फोडले व आत प्रवेश केल्यावर मशीन चा डिस्प्ले बोर्ड वर उचलून मागे पुढे करून तोडले व मशीन तोडण्याचा प्रयत्न केले मात्र रक्कम काढता न आल्याने बँकेच्या समोर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून टाकून एटीएम मशीनची तोडफोड केली आहे.
बँक ऑफ इंडिया शाखा देसाईगंज येथील शाखा व्यवस्थापक वैभव भोयर यांनी पोलीस स्टेशन मध्ये बँकेच्या मालमत्तेचे नुकसान करणे व चोरीचा , दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल लेखी तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान पोलिसांनी स्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते मात्र सुगावा लागला नाही. पोलीस निरीक्षक महेश मसराम अधिक तपास करीत आहेत.
“शाखा परस्पर हलविली”
बँक ऑफ इंडियाची शाखा आधी मुख्य बाजारपेठेत होती. ही शाखा शहरातील शाळा परिसरात हलविण्या पुर्वी कुठल्याही वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध न करता शाळा संचालकाने नागपूर च्या जेमतेम निवृत्त होणाऱ्या रिजनल मनेजर सोबत आर्थिक गैरव्यवहार करून जाहिरात प्रसिद्ध करु न देता परस्पर करारनामा करून परस्पर हलविले आहे.ही बँक ऑफ इंडिया ची शाखा अशा सानसून जागेवर हलविली कशी असा प्रश्न शहरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या शाखेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या घटनेनंतर वरिष्ठांचे आता तरी डोळे उघडले जातील असे बँक कर्मचारी दबक्या आवाजात बोलत आहेत.