बफर क्षेत्रातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे . हा परिसर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अखत्यारीत असल्यामुळे येथील नागरिक पूर्वी पासून जंगलावर आधारित व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे . वनजमिनीचे स्थायी पट्टे मिळण्याबाबत नागरिकांनी दावे सादर केले आहे . मात्र वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची अन्यायकारक मोहीम वनविभागातर्फे राबविली जात आहे . त्यामुळे बफर क्षेत्रातील नागरिकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे . या समस्येसंदर्भात भाजपा तर्फे लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे . या आंदोलनात बफर क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी , चंद्रपूर तालुका तथा भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी , चंद्रपूर तालुका यांच्या कडून करण्यात आले आहे .
या आहेत मागण्या
* वनदावे मंजूर करतांना लावण्यात आलेली तीन पिढ्याची आत रद्द करून स्थायी पट्टे देण्यात यावे .
* जे शेतकरी २५ ते ३० वर्षांपासून शेतजमिनीची वहिवाट करीत आहे . त्यांना त्यांच्या जमिनी परत * देण्यात याव्यात .
* वनविभागाकडून लावण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे .
* वनविभागाकडून जनतेला वारंवार ३५३ कलाम लावण्याची धमकी दिली जाते , ती त्वरित थांबविण्यात यावी .
* मोहफूल व तेंदूपता विक्रीचे केंद्र देण्यात यावे .
* बांबू कारागिरांना बांबू पुरवढा करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा .
* गॅस सिलेंडरचा रिफील मोफत देण्यात यावा .
* या परिसरातील पट्टेधारक शेतकऱ्यांना मोफत लोखंडी जाळीचे कुंपण उपलब्ध करून देण्यात यावे .
* पिंपळखुटा व सर्व गावाच्या हद्दीत लावलेले चेक पोष्ट त्वरित बंद करण्यात यावे .
* बफर क्षेत्रातील जिप्सी धारक व गाईड यांच्या समस्या त्वरित सोडविण्यात याव्या .