कोरची:- दि. ३० मे २०२२ रोज सोमवारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देसाईगंज वडसा येथील कुरूड या गावी गडचिरोली जिल्ह्याचे नेते माजी राज्यमंत्री व अहेरी विधानसभा आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूका संबंधित पक्ष्याच्या कार्यकर्त्यांची सभा पार पडली. या वेळी राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते कोरची तालुक्याची धुरा स्थानिक आदिवासी समाजाकडे असावे या हेतून सियारामजी हलामी यांना तालुका अध्यक्ष पदाचे नियुक्ति पत्र देऊन त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोरचीची सम्पूर्ण जिम्मेदारी देण्यात आली. तसेच माजी तालुका अध्यक्ष प्रतापसिंग गजभिये यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
कोरची तालुक्याचा पक्ष वाढीचा विषय गंभीरतेने धरून कोरची तालुक्याचा नेतृत्व स्थानिक आदिवासी समाजाकडे असावा या हेतूने कोरची शहर अध्यक्ष अविनाश हुमणे यांनी नेहमी येथील नेतृव बदल हा विषय धरून जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर आणि जेष्ठ नेते नानाभाऊ नाकाडे यांच्याशी नियमित वार्तालाब करित होते..
कोरची तालुका हा गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावर असलेला तालुका आहे. हा तालुका कित्येक वर्षापासून विकासाच्या कोसो दूर आहे. या तालुक्यातील स्थानिक नागरिकांची समस्या अनेक आहेत पण याकडे पाहिजे तेवढेच शासनाचा लक्ष नाही. खरं तर या तालुक्यातील समस्या ह्या शासनापर्यंत घेऊन जाणारा नेतृत्व हा इथला आदिवासी नाही. स्थानिक आदिवासींना तालुक्याच्या समस्या व त्याचे निराकरण हे माहीत असते. स्थानिक आदिवासी ह्या तालुक्याचं समस्या शासनापर्यंत पोहचवू शकतो. व सर्वसामान्य आदिवासी समाजाला न्याय मिळवून देऊ शकतो..
या दृष्टिकोनातून धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते नेतृत्वबदल करण्यात आला.
सियारामजी हलामी यांनी नियुक्तीचे श्रेय मा. जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, ज्येष्ठ नेते नानाभाऊ नाकाडे, प्रदेश संघटक सचिव युनूसभाई शेख, महिला नागपुर विभागीय अध्यक्ष शाहीनभाभी हकीम, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, कोरची शहराध्यक्ष अविनाश हुमणे, युवक शहरध्यक्ष चेतन कराडे, आरमोरी तालुका अध्यक्ष संदीपभाऊ ठाकूर, वडसा तालुका अध्यक्ष क्षितिजभाऊ उके, कोरची महिला तालुकाध्यक्ष गिरजाताई कोरेटी, जेष्ठ कार्यकर्ते विनोदभाऊ कोरेटी, वडसा शहराध्यक्ष लतीफ भाई शेख, कोरची युवक तालुकाध्यक्ष स्वप्निल कराडे व आपल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले आहे.
सियाराम हलामी यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्यातून व तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.