भद्रावती :राज्यसरकारने नाफेड मार्फत होणारी चना या शेतमालाची खरेदी बंद केली असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन राहिलेले आहे. राज्यसरकारने किमान सद्यस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चना विक्रीसाठी नाफेड कडे नोंदणी केली आहे, अशा शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवि शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे कडे केलेली आहे.
सद्यस्थितीत शेतीचा हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांना बी-बियाणे व खते घेण्याकरीता पैशाची अडचण असल्यामुळे आजच्या घडीला शेतकऱ्यांना पैशाची खुप मोठी अडचण आहे. परंतु सरकारने भारतीय राष्ट्रीय विपनन संघ मर्या. (नाफेड) यामार्फत शेतकऱ्यांचा चना हा आधारभूत किमतीने घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती व त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी तशी नोंदणी सुद्धा केली होती, परंतु अचानक नाफेडने चना खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना चना हा नाफेड कडे विक्रीसाठी प्रतिक्षेत आहे. शेतकऱ्यांचा शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे. त्यामुळे शेतकरी नाफेडची खरेदी बंद असल्यामुळे खुल्या बाजारपेठेत शेतकरी आपला चना कवडीमोल भावाने जास्तीत जास्त विकत आहे व शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
म्हणून नाफेडमार्फत चना खरेदी तात्काळ सुरू करण्याकरीता सहकार्य करावे जेनेकरून त्यांना याचा फायदा होईल, असे रवि शिंदे यांनी म्हटले आहे.