गोंडपिपरी-(सुरज माडुरवार)
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या नांदगाव येथिल सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक सोबतच निकाल दि.२२ रविवारी पार पडला.प्रतिष्ठेच्या लढतीत सहकार नेते संतोष रावत यांच्या गटाचा “ग्रामविकास शेतकरी” पॕनलचा पगडा भारी ठरला असून त्यांनी गड जिंकला आहे.
१३ संचालक असलेल्या नांदगाव सेवा सहकारी संस्था निवडणुकीत मात्तबर लोकांनी एकत्र येत पूर्ण पॅनल लढवली या मात्तबरांना ग्रामविकास शेतकरी पॅनेलने धक्का दिला १३ उमेदवार बहुमताने निवडणून आले. सर्वसाधारण कर्जदार गटातून प्रकाश आंबटकर,प्रभाकर अनलवार, प्रशांत बांबोडे, सदाशिव मशाखेत्री, वसंत मोहूर्ले,नीलकंठ नरसपुरे, संदिप रायपल्ले,अशोक उमक अनुसुसूचित जाती जमाती गटातून मंदाबाई लाकडे,विमुक्त भटक्या जाती जमाती गटातून गंगाधर शिंदे,महिला राखीव गटातून सुनंदा काळे,सखुबाई गंपलवार तर इतर मागासवर्गीय गटातून त्रिमूर्ती नायगमकर यांनी अविरोध विजय मिळवला विजयानंतर सर्व नवनियूक्त संचालकांचा सत्कार करण्यात आला डिजेच्या तालावर विजयी रॅली काढण्यात आली.चूरशिच्या या विजयात ग्रामविकास शेतकरी पॅनल चे माजी उपसभापती दशरथ वाकुडकर,ग्रा.पं सदस्य प्रशांत बाम्बोडे,सरपंच हिमानी वाकुडकर,उपसरपंच सागर देऊरकर,ग्रा.पं सदस्य काजुल लाकडे,ग्रा.पं सदस्य समीर काळे यांच्या अथक परिश्रमाने नांदगाव गोवर्धन सेवा सहकारी संस्थेचा गड जिंकला