• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

पेट्रोल टाकीत दारूच्या निपा; तरुणांची तस्करीची अनोखी शक्कल!

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
October 19, 2026
in Gadchiroli
A A
0
पेट्रोल टाकीत दारूच्या निपा; तरुणांची तस्करीची अनोखी शक्कल!
Spread the Information

गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैध दारूची वाहतूक करण्यासाठी तस्करांकडून नवनवीन शक्कल लढवली जात असल्याचे समोर आले आहे. चक्क दुचाकीच्या पेट्रोल टाकी आणि सीटच्या आतील भागात देशी दारूच्या निपा लपवून वाहतूक करण्याचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी उधळून लावला. या कारवाईत दोन तरुणांना ताब्यात घेत दोन दुचाकींसह एकूण २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

RelatedPosts

विद्यार्थी अधिकारी बनून परतला; गुरुजनांचा ऊर अभिमानाने भरला!

पेट्रोल टाकीत दारूच्या निपा; तरुणांची तस्करीची अनोखी शक्कल!

पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. बंटी भांगडिया यांची अहेरीत सदिच्छा भेट

गडचिरोली ते चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीजवळ १८ ऑक्टोबर रोजी नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयास्पद दुचाकींवर नजर ठेवली असता, दोन तरुण भरधाव वेगाने गडचिरोलीच्या दिशेने येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता, तानाजी नानाजी पेंदोरकर (वय ३२) आणि सौरभ प्रकाश महाजनवार (वय १९), दोघेही रा. व्याहाड (बु.), ता. सावली, जि. चंद्रपूर, अशी त्यांची नावे निष्पन्न झाली.

पेट्रोल टाकी अन् सीटमध्ये दारूचा साठा!

पंचांसमक्ष दोन्ही दुचाकींची तपासणी केली असता, वाहनांच्या पेट्रोल टाकी व सीटच्या आतील भागात दारूच्या निपा लपवून ठेवल्याचे आढळले. एका दुचाकीत ९० मिली क्षमतेच्या रॉकेट संत्रा देशी दारूच्या २०० निपा, किंमत १६ हजार रुपये, तर दुसऱ्या दुचाकीतही तितक्याच निपा आढळल्या. दोन्ही वाहनांतील दारूची एकूण किंमत ३२ हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या दोन दुचाकींची अंदाजित किंमत २ लाख रुपये आहे. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५६६/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ) व ८३ अंतर्गत दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.
सीमांवर २४ तास नाकाबंदी
गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्ह्याच्या सीमांवर २४ तास नाकाबंदी राबविण्यात येत आहे. अवैध व्यवसायांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील, असे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी स्पष्ट केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. आणि प्रभारी सहायक पोलीस अधीक्षक सुयश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली, गडचिरोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Previous Post

पेट्रोल टाकीत दारूच्या निपा; तरुणांची तस्करीची अनोखी शक्कल!

Next Post

विद्यार्थी अधिकारी बनून परतला; गुरुजनांचा ऊर अभिमानाने भरला!

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
विद्यार्थी अधिकारी बनून परतला; गुरुजनांचा ऊर अभिमानाने भरला!

विद्यार्थी अधिकारी बनून परतला; गुरुजनांचा ऊर अभिमानाने भरला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
राजा रावण दहन प्रथा बंद करा; १४ आदिवासी संघटना एकवटल्या!

राजा रावण दहन प्रथा बंद करा; १४ आदिवासी संघटना एकवटल्या!

October 20, 2026
विद्यार्थी अधिकारी बनून परतला; गुरुजनांचा ऊर अभिमानाने भरला!

विद्यार्थी अधिकारी बनून परतला; गुरुजनांचा ऊर अभिमानाने भरला!

October 19, 2026
पेट्रोल टाकीत दारूच्या निपा; तरुणांची तस्करीची अनोखी शक्कल!

पेट्रोल टाकीत दारूच्या निपा; तरुणांची तस्करीची अनोखी शक्कल!

October 19, 2026
पेट्रोल टाकीत दारूच्या निपा; तरुणांची तस्करीची अनोखी शक्कल!

पेट्रोल टाकीत दारूच्या निपा; तरुणांची तस्करीची अनोखी शक्कल!

October 19, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1