गडचिरोली:जिल्हा परिषद येथील अनुकंपाधारकामधून अंतर्गत गट-क व गट-ड रिक्त पदभरती घेण्यात येणार असून शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती संबंधाने १० सप्टेंबरला समुपदेशन प्रक्रिया पार पडणार आहे.
जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेले विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकामधून भरावयाच्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद, गडचिरोली अतर्गत सन २०२३ मध्ये पूर्ण झालेल्या अनुकंपा प्रकरणाची तपासणी करून पुर्ण माहिती असलेल्या एकूण २५१ उमेदवारांचा अंतिम जेष्ठता सुची तयार करून जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे फलकावर प्रकाशित करण्यात आलेली होती.
या कार्यालयाचे पत्र दिनांक २२ ऑगस्ट २०२४ राजा प्रकरण पूर्ण असलेल्या प्रतिक्षाधिन सूचीतील अनुक्रमांक ०१ ते १५० पर्यतच्या अनुकंपाधारक उमेदवारांचे दस्ताऐवजांची पडताळणी करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने येत्या १० सप्टेंबर २०२४ रोजी ठिक सकाळी ११.०० वाजता वर्ग-३ व वर्ग-४ च्या पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती संबंधाने समुपदेशन घेण्यात येणार आहे. तरी प्रकरण पूर्ण असलेल्या प्रतिक्षाधिन सुचीतील अनुक्रमांक ०१ ते १५० पर्यंतच्या उमेदवारांनी मुळ दस्ताऐवजांसह विर बाबुराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद, गडचिरोली येथे समुपदेशानाकरीता उपस्थित राहावे.
प्रतिक्षाधिन सुचीतील अनुकंपाधारकांची नेमणूक शैक्षणिक अर्हता तसेच सामाजिक प्रवर्गानुसार समुपदेशन प्रक्रियाव्दारे व पारदर्शकता ठेवून राबविण्यात येत असल्याने उमेदवारांनी कोणत्याही आमीषाला / भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयूषी सिंह यांनी केले आहे.