चंद्रपूर (आशिष घुमे ) : भारतीय जनता पार्टीच्या राजुरा तालुका व शहराच्या वतीने स्थानिक सुपर मार्केट हॉलमध्ये आयोजित केलेल्या विस्तारीत कार्यकारणी बैठकीला उपस्थित राहून राजुरा विधानसभा क्षेत्र प्रमुख देवराव भोंगळे यांनी आपल्या समारोपीय मनोगतातून विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात एनडीएला मिळालेल्या संपूर्ण बहुमताचे यश भाजपाच्या कार्यक्षमतेचे प्रतीक आहे, असे भोंगळे यांनी नमूद केले. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, युवा, महिला, आदिवासी, वंचित आणि निराधार बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले असामान्य कार्य जनतेला नवा विश्वास देत आहे.
भोंगळेयांच्या भाषणात राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे नेतृत्व विशेषतः उल्लेखले गेले. महायुती सरकारने राज्याला विकासाच्या प्रगतीपथावर नेण्याकरीता प्रभावी धोरणात्मक बदल केले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
भोंगळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजुरा मतदारसंघावर विजय मिळवण्याची आवश्यकता आणि संकल्प स्पष्ट केला. त्यांनी कार्यकर्त्यांना या विजयासाठी एकजूट होण्याचे आणि प्रयत्नांची कास धरण्याचे आवाहन केले.
बैठकीदरम्यान, जिल्हा प्रतिनिधी लोकसभा सह विस्तारक नामदेव डाहुले यांनी आगामी संघटनात्मक कार्यक्रमाची माहीती दिली. मोदी सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी तर राजकीय प्रस्ताव तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे यांनी मांडला. शहर महामंत्री मिलिंद देशकर यांनी या प्रस्तावांना सर्वसंमतीने अनुमोदन दिले.
यावेळी मंचावर जिल्हा महामंत्री विवेक बोढे, शहराध्यक्ष सुरेश रागीट, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, जिल्हा सचिव संजय उपगण्लावार, आदिवासी नेते वाघुजी गेडाम, तालुका महामंत्री वामन तुराणकर, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा मंजुषा अनमुलवार, शहराध्यक्षा माया धोटे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अजय राठोड, शहराध्यक्ष प्रफुल्ल घोटेकर, तालुका महामंत्री दिलीप गिरसावळे, शहर महामंत्री अनंता येरणे, सचिन डोहे, सुरेश धोटे, भाजयुमोचे महामंत्री आकाश गंधारे, महिला मोर्चाच्या महामंत्री पौर्णिमा उरकुडे, शहर महिला मोर्चाच्या महामंत्री प्रियदर्शनी उमरे, शितल वाटेकर, ममता केशेट्टीवार, योगीता भोयर, भाजपा नेते सतीश कोमरवेल्लीवार, श्यामराव कस्तुरवार, भाऊराव चंदनखेडे, सिनु उत्नुरवार, मंगेश श्रीराम, सईद कुरेशी, हरिदास झाडे, शंकर मडावी, राजकुमार भोगा, भाऊराव बोबडे, भिमराव पाला, शंकर धनवलकर, विनोद नरेन्दुलवार, संजय वासेकर, क्रिष्णावतार संभोज, प्रदिप मोरे, आकाश चिंचाळकर, अरूण लोहबडे, अमोल सोनेकर, सोशल मीडियाचे संयोजक हितेश गाडगे, स्वप्नील राजुरकर, प्रदिप बोबडे, मोतीराम पोटे, जगदीश साठोणे, रविंद्र जेनेकर, रविन्द्र गोरंतवार, संतोष देरकर, सदाशिव आदे, सचिन भोयर, प्रणव मसादे, अंकुश कायरकर, महेश झाडे, सुरज हरीहर, शैलैश चटके, सिमा देशकर, सुनंदा डोंगे, शुभांगी रागीट, दिपा बोंथला, गौरी सोनेकर, अल्का जुलमे, सुमा शेख, प्रिती समर्थ, सारिका शहा आदिंसह अनेकांची उपस्थिती होती.