अहेरी:-भोई समाजाच्या वतीने मागील 46 वर्षा पासून अहेरी येथे पारंपारिक व ऐतिहासिक रित्या गंगा देवीची मूर्ती प्रतिष्टापणा करून उपासना केली जाते. यंदाही 28 जुलै रविवार रोजी गंगा देवीची प्रतिष्ठापणा करून 30 जुलै मंगळवार रोजी ढोल-ताशा , डिजेच्या तालावर विसर्जन मिरवणूक काढण्यात आले.
उल्लेखनीय म्हणजे गंगा देवीच्या प्रतिष्टापनेमुळे पाऊस चांगला व समाधानकारक पडून मासेमारी व शेतीच्या व्यवसायात भरभराटी येते अशी आख्यायिका प्रचलित असून गंगा देवीच्या प्रतिष्ठापने दरम्यान दररोज पाऊस बरसतेच हे मात्र नक्की!
दरवर्षी प्रमाणे यंदाही गंगादेवी विसर्जन रॅलीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम सामील होऊन गंगा माता देवीचे दर्शन घेतले व पूजन करून अहेरी विधानसभेतील जनतेमध्ये सुजलाम सुफलाम येवो आणि सर्व आनंदित राहो अशी मनोकामना केले.विसर्जन मिरवणुकीत महिला भगिनींच्या आग्रहास्तव दस्तुरखुद्द जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम सुध्दा डिजेच्या तालावर ठेका धरून थिरकल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगर सेवक अमोल मुक्कावार, श्रीनिवास चटारे, अफसर खान पठाण, सुमित मोतकुरवार, अक्षय येन्नमवार, अनुराग बेझलवार, संतोष येमुलवार, तुषार पारेल्लीवार, संदीप गुम्मलवार, महेश बाक्केवार, नारायण बाक्केवार, उमेश बाक्केवार, आदी व भोई समाजाचे समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.