• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा दूरदृश्य प्रणालीद्वारे दुर्गम भागातील नागरिकांशी थेट संवाद; दुर्गम भागातील नागरिकांना पहिल्यांदाच मिळाली समस्या मांडण्याची संधी

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
July 29, 2024
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा दूरदृश्य प्रणालीद्वारे दुर्गम भागातील नागरिकांशी थेट संवाद; दुर्गम भागातील नागरिकांना पहिल्यांदाच मिळाली समस्या मांडण्याची संधी
Spread the Information

गडचिरोली:मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी निर्माण झाली आहे.अहेरी उपविभागातील सिरोंचा आणि भामरागड या तालुक्यांचा अहेरी मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.एटापल्ली,भामरागड, सिरोंचा आणि अहेरी ही चार तालुके अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जातात. एकीकडे पूर परिस्थिती, रस्त्यांची दयनीय अवस्था आणि त्यातच २८ जुलै पासून सुरू झालेला नक्षल्यांचा शहीद सप्ताह.यामुळे या चार तालुक्यातील दुर्गम गावांना अधिकाऱ्यांना भेट देणे शक्य नसल्याने अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी पहिल्यांदाच दूरदृष्टी प्रणालीद्वारे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

सध्याच्या परिस्थितीत भामरागड, सिरोंचा आणि एटापल्ली तालुक्यातील बरेच गावातील नागरिक जिल्हा मुख्यालय तर सोडा किमान अहेरी पर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे तालुका पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या,विविध विभागाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत थेट छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली. विशेष म्हणजे नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रभारी जिल्हाधिकारी पदाचा त्यांनी कार्यभार सांभाळले.त्यादरम्यान त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर ‘जनसंवादातून सुशासनाकडे’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला होता. सध्या अहेरी उपविभागातील परिस्थिती लक्षात घेता त्यांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्वांना एकत्रित आणून एटापल्ली,सिरोंचा आणि अहेरी या तीनही तालुक्यातील अतिदुर्गम गावातील नागरिकांच्या आरोग्य, शिक्षण,शेती,पूरपरिस्थिती त्यासोबतच विविध समस्या जाणून घेतली.

दुर्गम भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहण्याबाबत, आरोग्यसेवेसंबंधी आवश्यक कामांसाठी निधीची मागणी करण्याबाबत, रस्ते वाहतूक सुरळीत ठेवणेबाबत व नुकसाणीचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्याबाबत यंत्रणेला सूचना दिली. एवढेच नव्हे तर यावेळी वांगेझरी येथील सर्पदंश झालेले रूग्ण बापूराव वासुजी शेंडे, कोटमी आश्रमशाळेतील आजारी विद्यार्थी अनिल माझी कवडो, कसनसूर येथील इतर दोन रुग्ण आणि कल्लेड येथील काही शेतकऱ्यांशी त्यांनी थेट संवाद साधला. विशेष म्हणजे या चार तालुक्यातील बरेच गावांमध्ये वीज सुद्धा पोहोचली नव्हती. मात्र आता या भागातील नागरिक थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना सुद्धा प्रत्यक्ष समस्या मांडण्याची संधी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.

अतिदुर्गम भागातील नागरिकांशी दूरदृष्टी प्रणालीद्वारे थेट संवाद साधून समस्या जाणून घेण्यात आले. एटापल्ली, अहेरी, सिरोंचा या तीन तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना एकत्र करून समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्याबाबत निर्देश देण्यात आले. भामरागड तालुक्यामध्ये मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे आढावा घेता आले नाही.अशा उपक्रमामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटतील आणि प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी फायदा होणार आहे.
-विजय भाकरे,अप्पर जिल्हाधिकारी,अहेरी

Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या वाढदिवसानिमित्य ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Next Post

उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणी मुख्य आरोपीस अटक

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणी मुख्य आरोपीस अटक

उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणी मुख्य आरोपीस अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1