गोंडपिपरी – (सुरज माडूरवार)
चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात विविध अवैद्य धंद्यांना उत आले आहे.अशातच दि (१६) मंगळवारी धाबा पोलिसांनी धडक कारवाई करत. तेलंगणा कत्तलीसाठी नेणाऱ्या ३५ जनावरांची सुटका करून १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
आष्टी वरून हीवरा मार्गे ट्रक जनावरांची अवैद्यरित्या वाहतूक करत तेलंगणा राज्यात नेत असल्याची माहिती धाबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश गावळे यांना मिळाली त्यांनी सहकारी पोलीस स्टॉप जीवन आचेवार,श्रावण कुत्तरमारे यांच्या सोबतीने हिवरा मार्गावर नाकाबंदी लावली TS O8UD2702 क्रमांकाच्या ट्रकला थांबवून चौकशी केली असता ३५ नग जनावरे कोंबून निर्दयीपणे कत्तलीसाठी तेलंगणा नेत असल्याची माहिती मिळाली.१४ लाखाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी मोहम्मद महमूद अली वय (३६)असिफाबाद,रो हालदार वय (२९) विकासपल्ली(गडचिरोली) यांना अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला.जप्त केलेले जनावरे प्यार फाऊंडेशन चंद्रपूर येथे पोहचविण्यात आले.