गडचिरोली :- शिवसेना पक्षाचा प्रमुख घटक (पाया) असलेल्या, “भारतीय कामगार संघटनेची” पक्षात महत्त्वाची भुमिका आहे.
हिंदुहदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी सुरूवातीला, कामगारांना भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नांसाठी पुढाकार घेऊन, महाराष्ट्रभर पक्षाची पाळेमुळे रोवली.त्याला महाराष्ट्रातील कामगारांची अभुतपूर्व साथ मिळाली.
पुढे वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असतांना,महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील,कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत असून,ना.शिंदे सरकार सतत कामगारांच्या कल्याणासाठी,त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यासह, चामोर्शी तालुक्यात,शिवसेना पक्षासाठी सत्यपाल परशुराम कुत्तरमारे या शिवसैनिकाने केलेल्या अविरत कार्याची दखल घेऊन,शिवदुत तयार करणे,शिवसेना सदस्य नोंदणी,शिवसेना संघटनात्मक कार्यकारिणी तयार करणे,आनंद दिघे रुग्णालय शिबीर,भव्य रक्तदान शिबीर यासारखे उपक्रम राबविण्यात आले,या कार्याची दखल घेऊन,शिवसेना भारतीय कामगार संघटनाचे महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मण (भाई) तांडेल यांनी सत्यपाल परशुराम कुत्तरमारे या शिवसैनिकाची,भारतीय कामगार संघटना महाराष्ट्राच्या,गडचिरोली जिल्ह्याचे कामगार संघटनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी म्हणून दिनांक ०६ जानेवारी २०२४ रोज शनिवारला,निवड करण्यात आली,या निवडीचे शिवसेना जनसंपर्क अधिकारी गौरव नागपूरकर आणि महेश कुथे यांनी शुभेच्छा दिल्या तसेच जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आणि कामगारांनी आनंंद व्यक्त केला आहे.