गोंडपिपरी (सुरज माडूरवार) :- गोंडपिपरी तालुक्यातील वादग्रस्त ‘कुलथा’ घाटावर गुंड प्रवृत्तीच्या रेतितस्करांचा दि.(२८) बुधवारी रात्री १ वाजता दरम्यान गावकऱ्यांनी जेसीबी व पोकलेन नदिघाटात टाकायला अडवल्याननंतर तस्करांनी गावकऱ्यांवर चाकू व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला.हल्ल्यात सरपंचा सह महिलांना मारहाण करण्यात आली.तारडाचे सरपंच तरुण गंगाराम उमरे,तमुस अध्यक्ष चंद्रशेखर सुधाकर लखमापुरे गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडली.
गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा रेती घाटासह अनेक घाटावरून रात्रीच्या सुमारास जेसीपी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने ट्रॅक्टरने स्टॉक तयार करत रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.
स्थानिक प्रशासनाच्या नाकावर टीच्चून रेती तस्करी केल्या जात आहे.जिल्हा प्रशासनाने रेती घाटावर उरलेला स्टॉक उचलण्याची(३१) डिसेंबर पर्यंत परवानगी दिली होती.मात्र अनेक घाटावर स्टॉक शिल्लक न्हवता मिळालेल्या परवानगीच्या आधारावर संधीचा फायदा घेत स्टॉक व्यतिरिक्त पुन्हा नदीपत्रातून रेती उपसा करने सुरू आहे. मोठ्या प्रमाणात रेती तस्करांकडून दादागिरी करत रेती उपसा सुरू आहे.नदीपात्रात जेसीबी,हायवा,पोकलेनचा वापर करू नये यासाठी सरपंच, तमुस अध्यक्ष यांच्यासह काही महिलांनी रेती घाटावर धडक दिली.शाब्दिक वादानंतर मारहाणीत रूपांतर झाले.रेती तस्करांनी लोखंडी रॉड व धार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. हलेखोरांची ओडख पटली असून हल्लेखोरांनी घटस्थळवरून पळ काढला.जखमींच्या बयानानुसार ३०७ कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अद्याप हलेखोर पोलिसांच्या हाती सापडले नाही.अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले असून पुढील तपास ठाणेदार जीवन राजगुरू,पीएसआय मोगरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.गंभीर जखमी असल्याने तरुण उमरे,तमुस अध्यक्ष चंद्रशेखर लखमापुरे यांना चंद्रपुर जिल्हा ग्रामीण रुग्नालयात रेफर करण्यात आले आहे.
शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल पाण्यात बुडत आहे . कुलथा परिसर रेती तस्करीच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असतो.रेती उत्तम दर्जाची असल्याने येथील रेतीला मार्केट मधे मोठी मागणी आहे. मागील काही दिवसांमध्ये परिसराला रेती तस्करांचे ‘माहेरघर’ म्हणून पाहिले जात आहे.जिल्ह्यातील अनेक मोठे व्यावसायिक,राजकीय नेते या तस्करीत उतरले असून यांना आळा कोण घालणार ..? असा प्रश्न निर्माण झाला आहे. घाटालगत गावे असल्याने नागरिकांची झोपमोड होत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.या गंभीर प्रकाराकडे महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.