आलापल्ली:आजची पिढी ही अत्यंत संवेदनशील असून त्यांची आकलन शक्ती प्रभावी असते.या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविणे ही गरज असल्याचे प्रतिपादन अहेरीचे ठाणेदार मनोज काळबांधे यांनी केले.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख,कुमार चिंता,एस.रमेश यांच्या संकल्पनेतून तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनात अहेरी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आलापल्ली येथील क्रीडा संकुल हॉल मध्ये पोलिसांचा जनजागरण मेळावा व आदिवासी रेला नृत्य कार्यक्रम ११ डिसेंबर रोजी संपन्न झाला.यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.या कार्यक्रमाचे उदघाटन अहेरीचे नायब तहसीलदार हमीद सय्यद यांच्याहस्ते करण्यात आला तर,अध्यक्ष स्थानी पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे,प्रमुख पाहुणे म्हणून आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम,राणी दुर्गावती हायस्कुलचे प्राचार्य लोनबले, राजे धर्मराव हायस्कुल प्राचार्य एच बी खोब्रागडे, नागेपल्ली ग्रामपंचायत चे सदस्य मलरेड्डी येमनूरवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण,पोलीस उप निरीक्षक रुपाली काळे,पोलीस उप निरीक्षक करुणा मोरे,पोलीस उप निरीक्षक करिश्मा मोरे,सुरेश मडावी,शंकर येरमे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना काळबांधे यांनी आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त गुण असून त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळाल्यास ते विविध क्षेत्रात पुढे जाऊ शकतात.त्यासाठी गडचिरोली पोलीस दल पुरेपूर प्रयत्न करीत आहे.त्यामुळे युवक आणि युवतींनी विविध क्षेत्रात पुढाकार घेऊन सातत्याने प्रयत्न करावे.त्यासाठी योग्य फ्लॅटफॉर्म देण्याचा काम आमच्या पोलीस विभागामार्फत करण्यात येईल असेही त्यांनी आश्वासन दिले.एवढेच नव्हेतर जनजागरण मेळावा व रेला नृत्य कार्यक्रमात सहभागी झालेल्या युवक युवतींना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
आयोजित कार्यक्रमात परिसरातील ११ शाळेतील विध्यार्थी रेला नृत्यात सहभागी झाले होते.यातील शंकरराव बेझलवार कला वाणिज्य महाविद्यालय,अहेरी ने तृतीय क्रमांक,काली कंकाली रेला डान्स ग्रुप चुटुगुंटा द्वितीय क्रमांक तर आदिवासी मुलांचे वस्तीगृह,आलापल्ली ने प्रथम पारितोषिक पटकाविले.तिन्ही चमुंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकर्षक शिल्ड,प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. एवढेच नव्हे तर उपस्थित विविध चमुंना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.रेला नृत्यसाठी पर्यवेक्षक म्हणून एस बी कॉलेज अहेरीचे मंगला बन्सोड, राणी दुर्गावती विद्यालय आलापलीचे सिलमवार आणि अहेरी पोलुस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक करुणा मोरे यांनी काम केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक करिश्मा मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहेरी पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.