एटापल्ली: तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जारावंडी येथे १२ सप्टेंबर रोजी माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
जारावंडी येथील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाल्याने येथील नागरिकांनी सिमेंट रस्ते बांधकाम करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली होती.नागरिकांची अडचण लक्षात घेता भाग्यश्री आत्राम यांनी सिमेंट काँक्रीट रस्ता मंजूर करून दिला.निधी उपलब्ध झाला असून सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. तत्पूर्वी माजी जि प अध्यक्ष भाग्याश्री आत्राम यांच्याहस्ते सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.गावात आगमन होताच गावकऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन सरपंच,उपसरपंच आणि सदस्य यांच्याशी विकास कामाबाबत चर्चा केली.एवढेच नव्हेतर विकासात्मक कामांना निधी कमी पडू देणार नसल्याचे ग्वाही दिली.
भूमिपूजन प्रसंगी येथील सरपंच सपना कोडापे,उपसरपंच सुधाकर टेकाम,सदस्य दिलीप दास,तुकाराम मडावी,लक्ष्मीबाई मडावी,लक्ष्मी कुमरे,भाग्यश्री चौधरी,मुकेश कावळे,अन्नपूर्णा मोहूर्ले, सुनील धकाते,गुरुदास टिंगुसले,वासुदेव कोडापे,जइंद्रा पवार,घनश्याम नाईक,गुड्डू पोटावे, नवसु नरोटे आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.