देसाईगंज :- महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखुची अवैधरित्या वाहतुक होणार असल्याची गोपनीय माहिती देसाईगंज पोलिसांना मिळाली. याआधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहनाची झाडाझडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेत सुगंधित तंबाखूसह वाहन असा ३३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हि कारवाई ११ सप्टेंबर रोजी करण्यात आली.
आशिष अशोक मुळे (वय ३०) रा. खरबी, ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर, अतुल देविदास सिंधीमेश्राम (वय २९) रा. भवानी वार्ड, ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहेत.अगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांनी संपूर्ण जिल्हयातील पोस्टे/उप पोस्टे/ पोमके यांना महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखुची अवैधरित्या वाहतुक करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्या निर्देशानुसार ११ सप्टेंबर रोजी अवैधरित्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखुची वाहतुक होणार असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रासकर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार राऊत, ढोके, सराटे, कुमोटी यांनी सापळा रचून आशिष अशोक मुळे व अतुल देविदास सिंधी मेश्राम यांना पकडले व त्यांचे ताब्यातून लाल रंगाचे टाटा कंपनीचे आयशर वाहन क्र. एमएच ४०-सीएम ६५५२ किंमत १० लाख रु., २४ नग मोठ्या पांढ-या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येकी ६ नग पांढ-या रंगाचे कट्टे व त्या प्रत्येक कट्टयामध्ये इगल हुक्का शिशा तंबाखुचे ११ नग पॅकेट एकून किंमत १० लाख १३ हजार ७६० रु., २१ नग मोठ्या हिरव्या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येकी ४ नग पांढऱ्या रंगाचे कट्टे व प्रत्येक कट्टयामध्ये ईगल हुक्का शिशा तंबाखुचे ४४ नग पॅकेट एकुण किंमत ११ लाख ४५ हजार ७६० रु.,१४ नग लहान पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येक कट्टयामध्ये इगल हुक्का शिशा तंबाखुचे ४४ नग पॅकेट एकुण किंमत १ लाख ९० हजार ९६० रु. असा एकुण ३३ लाख ५० हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार दिनेश राऊत, नरेश कुमोटी, विलेश ढोके व संतोष सराटे यांनी केली.