अहेरी : झिमेला येथील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी नूतन वर्ग खोलीचे बांधकाम करण्यात आले.त्याचे उद्घाटन नुकतेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम व गुड्डीगुडाम ग्रामपंचायतचे सरपंच सरोज अनिल पेंदाम,प्रफुल नागुलवार उपसरपंच गुड्डीगुडम, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी सरपंच महेश मडावी,माजी उपसरपंच जगणाथ मडावी,माजी सरपंच धर्मराज पोरतेट,ग्रामपंचायत सदस्य दिवाकर गावडे,श्रीकांत पेंदाम,रुपेश आत्राम,जयश्री आत्राम,शोबा सिडाम,गननिडा वनपाकाला,महेश सिडाम,किस्टा आत्राम,रामा गावडे,व्यंकटी सडमेक,तिरुपती सडमेक,राम मडावी,किसन पोरतेट,विनोद तोरम,भगवान सिडाम,महेश सिडाम,अर्जुन सिडाम,पुला पोरतेट,प्रभाकर सिडाम,संतोष सिडाम,अरुणा सिडाम अंगणवाडी सेविका, श्रीनिवास राऊत,रामदास आत्राम,संदिप दुर्गे जिवन दुर्गे, दिलीप मडावी,समया पेंदाम,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक,महेश येरमे आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालय गुड्डीगुडम अंतर्गत येत असलेल्या झिमेला येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत जिल्हा वार्षिक योजन सन २०२१-२२ अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्ग खोलीचे बांधकाम मंजूर झाले होते. सदर वर्ग खोलीचे बांधकाम पूर्णत्वास आल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुसज्ज वर्ग खोली मिळाली आहे. यापुढेही गावात विकास कामासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याची ग्वाही अजय कंकडालवार यांनी दिली.