गडचिरोली:-अहेरी पंचायत समिती येथील तालुका पेसा समन्वयक (कंत्राटी) संजिव येल्ला कोठारी, वय ४२ वर्षे व खाजगी इसम अनिल बुधाजी गोवर्धन, वय ३० वर्ष, रा. व्यंकटापूर ता. अहेरी यांना १,३०,००० रुपयांची लाच रक्कम स्विकारलेवरुन अँटी करप्शन ब्युरो, गडचिरोलीच्या पथकाने दिनांक २५.०८.२०२३ रोजी रंगेहाथ पकडले व यातील पाहीजे असलेले आरोपी क. १ प्रभारी गट विकास अधिकारी प्रतिक दिवाकर चन्नावार यांचा ब्युरोकडून शोध सुरु आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार यांनी मौजा गोविंदगाव येथील तेंदुपत्ता युनिट लिलावात घेवून, सदर तेंदुपत्याचे वाहतूक परवान्याकरीता त्यांना गट विकास अधिकारी, पंचायत समिती अहेरी यांचे नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. ते मिळवून देण्याचे कामासाठी आरोपी क. १ प्रतिक चन्नावार, प्रभारी गट विकास अधिकारी व आलोसे क्र.२ संजिव कोठारी, तालुका पेसा समन्वयक (कंत्राटी) यांनी १,३०,००० रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांना आरोपीतांना लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार दिली.
पोलीस उपअधिक्षक अनिल लोखंडे यांचे पर्यवेक्षणात पो. निरीक्षक श्रीधर भोसले यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान तकारदार यांनी सन २०२२ यावर्षी मौजा गोविंदगाव येथील तेंदुपत्ता युनिट लिलावात घेवून, सदर तेंदुपत्ताचे वाहतुक परवान्याकरीता त्यांना नाहरकत प्रमाणपत्र मिळवून देण्याचे कामाकरीता आलोसे क.१प्रतिक चन्नावार, प्रभारी गट विकास अधिकारी व आलोसे क. २ श्री संजिव कोठारी, तालुका पेसा समन्वयक, दोन्ही पं.स. अहेरी यांनी १,३०,०००/- लाच रक्क्मेची पंचसाक्षीदारांसमक्ष सुस्पष्ट मागणी केली. आलोसे क.२ कोठारी यांचे सांगणेवरुन आरोपी क्र.३ अनिल गोवर्धन, खाजगी इसम हे सदर लाच रक्कम रुपये १,३०,०००/- स्विकारताता रंगेहाथ मिळून आले. यावरुन आलोंसे क. १ व २ तसेच खाजगी इसम यांचे विरूध्द पोलीस स्टेशन, अहेरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आलोसे यांचे निवासस्थानांची अॅन्टी करप्शन ब्युरोकडून झडती घेण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, अॅन्टी करप्शन ब्युरो, नागपूर, सचिन कदम, अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र. वि. नागपूर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात व पोलीस उपअधिक्षक अनिल लोखंडे यांचे पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पो. नि. शिवाजी राठोड, पोहवा नथ्थु धोटे, पो.ना. राजेश पदमगिरवार, किशोर जौंजारकर, पोशि संदीप उडान, संदिप घोरमोडे, चापोना प्रफुल डोर्लीकर सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.