गडचिरोली:-योग्य माहिती सर्व दूर पोहोचणे हे विकास प्रक्रियेसाठी आवश्यक असते. ती गरज पत्रकारिता पूर्ण करते. त्यामुळे पत्रकारितेत सामाजिक बांधिलकी जोपासली गेली पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.सह्याद्रीचा राखणदार या साप्ताहिक कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे नागपूर विभागीय अध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम,सह्याद्रीचा राखणदार साप्ताहिकाचे मुख्य संपादक मारोती नारायण घुमे,सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार,सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर व्ही बी बोम्मावार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.तर प्रमुख पाहुणे म्हणून साई बोम्मावार,फहिम भाई काजी,राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार,ग्रा प सदस्य मल्लारेड्डी बोम्मावार,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानकुमारी कौशी,अहेरी तालुका अध्यक्ष सारिका गडपल्लीवार,अहेरी शहर अध्यक्ष सुवर्णा पुसालवार,रा.म.कॉ चे जिल्हा सरचिटणीस जयश्री चिलवेलवार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष स्वप्नील श्रीरामवार, सूरज माडुरवार,सूरज घुमे,नागेपल्ली येथील प्रतिष्टीत नागरिक कांचनलाल वासनिक,गणेश दुर्गे,अशोक रापेल्लीवार,अमोल रापेल्लीवार, आलापल्ली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चांद्रकिशोर पांडे,सुमित मोतकुरवार,शुभम चिंतावार आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना लोकं स्थानिक भाषांमध्ये बातम्या वाचणे, ऐकणे अधिक पसंत करतात. स्थानिक भाषेतील पत्रकारिता ही मातीशी जुळलेली असते. ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम भाषिक माध्यमे अधिक चांगल्या पद्धतीने करतात. माध्यमांवर लोकजागृतीची महत्त्वाची जबाबदारी आहे. ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. विश्वासार्हता जपण्यासाठी माध्यमांनी वस्तूनिष्ठतेचे गांभीर्य जपले पाहिजे,असेही ते म्हणाले.
सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांनी डिजिटल माध्यमाने गेल्या दोन दशकांत अभूतपूर्व प्रगती केली आहे. डिजिटल माध्यमातून बातम्या तातडीने वाचकापर्यंत पोहोचतात. परिणामी वाचकांचाही ओढा डिजिटल माध्यमातून वाढतो आहे वाचकांना एका क्लिकवर तात्काळ बातम्या मिळत असल्याने वृत्तपत्र संकेतस्थळांना ही महत्त्व प्राप्त झाले आहे.सह्याद्रीचा राखणदार साप्ताहिक, पोर्टल,युट्युब चॅनल च्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शाहीन हकीम यांनी आपल्या मार्गदर्शनात गडचिरोली हा नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून गडचिरोली जिल्हा हा खूप मोठा आहे. सर्वच वृत्तपत्रांचे कार्यालय जिल्हा मुख्यालयातच आहेत.आलापल्ली व अहेरी सारख्या परिसरात असे कार्यालय आवश्यक असून पहिल्यांदाच सह्याद्रीचा राखणदार साप्ताहिकाचा माध्यमातून कार्यालय मिळालं आहे.विशेष म्हणजे वेब पोर्टल,युट्युब आणि साप्ताहिक पेपर असल्याने सर्वच माध्यमातून विविध बातम्या वाचायला आणि बघायला मिळणार आहे.या भागात कार्यालय उघडणे आणि काम करणे म्हणजे एकप्रकारचे आव्हानच आहे.तरीही हे धाडस सह्याद्रीचा राखणदार या सप्ताहिक ने करून दाखविले असून या भागातील नागरिकांसाठी आनंदाची बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सह्याद्रीचा राखणदार साप्ताहिक कार्यालय उदघाटनाचे प्रास्ताविक संपादक आशिष घुमे तर आभार गडचिरोली जिल्हा आवृत्तीचे संपादक महेश गुंडेटीवार तर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक आनंद अलोने यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रतिनिधी आनंद दहागावकर आणि संदीप येमनूरवार यांनी परिश्रम घेतले.