गडचिरोली:अहेरी तालुक्यातील कमलापूर ग्रामपंचायत अंतर्गत मागील वर्षी (2022 मध्ये) तेंदू संकलन करण्यात आले.याठिकाणी प्रति पुडा 11 रुपये नुसार दर ठरवून करारनामा करण्यात आले.मात्र,प्रति पुडा 10 रुपये नुसार रक्कम देऊन तब्बल 12 लाख रुपयांचा नुकसान केल्याने तेंदूपत्ता संकलन केलेल्या मजुरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.त्यामुळे ग्रामपंचायत अंतर्गत विविध गावातील लोकांना विश्वासात न घेता संबंधित कंत्राटदाराला नाहरकत प्रमाणपत्र देणारे पदाधिकारी आता गोत्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
मागील वर्षी कमलापूर ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ठ गावांत तेंदू संकलन करण्यासाठी 11 रुपये दर निश्चित करून करारनामा करण्यात आला होता.करारनामा नुसार संबंधित कंत्राटदाराला 4 रुपये 50 पैसे मजुरी आणि 6 रुपये 50 पैसे रॉयल्टी रक्कम असे एकूण 11 रुपये द्यायचे होते. याठिकाणी एकूण 1300 गोणी अपेक्षित होते.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत कमलापूर 1, कमलापूर 2,कोडसेलगुडम, आशा आणि नैनगुडम या 5 फडयावर तब्बल 12 लाख 810 इतके तेंदू पुडे संकलन करण्यात आले.
त्या अनुषंगाने तेंदू संकलन होताच संबंधित कंत्राटदाराने ठरल्यानुसार 4 रुपये 50 पैसे प्रमाणे मजुरी रक्कम म्हणून 54 लाख 3 हजार 645 रुपये दिले.त्यानंतर रॉयल्टी रक्कम म्हणून 6 रुपये 50 पैसे द्यावयाचे शिल्लक होते.मात्र,संबंधित तेंदू कंत्राटदाराने तब्बल एक वर्ष ती रक्कम अडवून ठेवली.येथील नागरिकांनी वारंवार भ्रमणध्वनी द्वारे,प्रत्यक्ष भेट घेऊन उर्वरित रक्कम देण्याचे विनंती केल्यावर संबंधित तेंदूपत्ता कंत्राटदाराने ती रक्कम दिली नाही.अखेर ग्रामस्थांनी तक्रार दाखल करतच नुकतेच काही दिवसांपूर्वी 6 रुपये 50 पैसे प्रमाणे रॉयल्टी रक्कम 78 लाख 5 हजार 265 रुपये न देता त्यांनी 5 रुपये 50 पैसे प्रमाणे रॉयल्टी रक्कम म्हणून 66 लाख 4 हजार 455 रुपये ग्रामसभा कोष समिती कमलापूर च्या खात्यात जमा केले. वास्तविक पाहता 6 रुपये 50 पैसे रॉयल्टी रक्कम ठरले असताना 5 रुपये 50 पैसे प्रमाणे रॉयल्टी रक्कम ग्रामकोश समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारल्याने.तब्बल 12 लाख 810 रुपयांचा नुकसान झाल्याचे तेंदू संकलन मजूर सांगतात.
एवढेच नव्हेतर ग्रामकोश समितीने कमलापूर ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट गावातील तेंदू संकलन मजुरांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतल्याचे आरोप गावकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात घोड झाला असून गोर गरीब मजुरांवर अन्याय झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांकडून रोष व्यक्त केला जात आहे.मात्र,ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामकोश समितीचे पदाधिकारी यावर काहीही बोलण्यास तयार नाहीत.तेंदूपत्ता संकलनचे दर ठरले असताना करारनामा नुसार पैसे न घेता रॉयल्टी रक्कम का कमी घेण्यात आला ? व ग्रामकोश समितीने संबंधित कंत्राटदाराला नाहरकत प्रमाणपत्र कसे दिले? असा प्रश्न आता तेंदू संकलन करणाऱ्या मजुरांकडून विचारला जात आहे.पूर्ण रक्कम दिल्याशिवाय आम्ही एकही रुपया घेणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतल्यामुळे नाहरकत प्रमाणपत्र देणाऱ्यांची गोची झाली आहे.त्यामुळे कमलापुर ग्रामपंचायतीतील मागील वर्षाचा तेंदु संकलन मुद्दा आता चांगलाच गाजणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.