गडचिरोली:- सोशल मिडियात खा. शरदचंद्र पवार यांना जीवे मारण्याची धमकी व आक्षेपार्ह मजकूर टाकन्यात आल्याने गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करण्याची मागणी गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस स्टेशनला तक्रार देऊन पोलीस गृह उपधीक्षक गौरव गावंडे यांची भेट घेतले व खा.शरद पवार यांच्यावर सोशल मिडियात झालेले प्रकार कथन करून कठोर कारवाईची मागणी शनिवारी 10 जून रोजी केले.
तक्रारीत नमूद केले आहे की, फेसबुक वरुण नर्मदाबाई पटवर्धन नावाच्या पेजवरुन ‘तुझा लवकरच दाभोलकर होणार’ अशी धमकी देण्यात आले व सौरभ पिंपळकर या ट्विटर हैंडलवरुण आक्षेपार्ह भाषा असलेले मजकूर टाकन्यात आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे व यामागचे ‘मास्टर माइंड’ कोन आहे याची कसून चौकशी करून आरोपीची छडा लावण्याचे व कठोर शिक्षा करण्याची तीव्र व एकमुखी मागणी करून गडचिरोली पोलीस स्टेशनला तक्रार दिले.
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांच्या नेतृत्वात सामाजिक न्याय विभाग महिला जिल्हाध्यक्ष प्रेमिला रामटेके, सोनाली पुण्यपवार, सुवर्णा पवार, आरमोरी तालुकाध्यक्ष ज्योती घुटके, अहेरी तालुकाध्यक्ष सारिका गड़पल्लीवार, ग्यानकुमारी कौशिक, माया सुनतकर या महिला पदाधिकारी सह लीलाधर भरडकर, विठ्ठल निखुले, कपिल बागड़े, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात ‘गुंडाराज’!
फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात दड़पशाही व गुंडाराज सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, देशाचे नेते शरदचंद्र पवार यांना सोशल मिडियात जीवे मारण्याची धमकी व आक्षेपार्ह मजकूर टाकन्यात आल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरनीवर आला आहे, रोजच्या रोज दुर्घटनेत वाढ़ झाली असून, महिला मुलींवर अन्याय अत्याचारातही वाढ़ झाली आहे, राज्यसरकारचे यावर कोणतेच नियंत्रण नसून एकंदरित राज्यात ‘गुंडाराज’ सुरु आहे.
-शाहीन हकीम
राष्ट्रवादी महिला काँग्रेस नागपुर विभागीय तथा जिल्हाध्यक्ष, गडचिरोली जिल्हा.