गडचिरोली:- उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अहेरी अंतर्गत येत असलेल्या व्यंकटापूर पोलीस स्टेशन येथे घेण्यात आलेल्या जनजागरण मेळाव्यात गरीब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सोबतच विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
30 डिसेंबर शुक्रवारी पोलीस अधीक्षक निलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे,अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक यतीन देशमुख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यंकटापूर पोलीस आणि नम्रता फाउंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानातून पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांसाठी भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी एसआरपीएफ चे पोलीस निरीक्षक शेंदरे,प्रमुख पाहुणे म्हणून नम्रता फाउंडेशन नागपूरचे पदाधिकारी तसेच येथील सरपंच,उपसरपंच तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
मेळाव्यात येथील प्रभारी अधिकारी संजय कुकलारे यांनी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देतानाच या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे उपस्थितांना आवाहन केले.तर,पोलीस निरीक्षक काळे यांनी लैंगिक अत्याचारापासून संवरक्षण,बालकांच्या संरक्षण कायदा विषयी योग्य मार्गदर्शन केले.या भव्य मेळाव्यात पोलिसांनी 100,आभा कार्ड,27,पॅन कार्ड,65 आधार कार्ड,125 सातबारा,70 आधार व मतदान कार्ड तसेच 3 ई-श्रम कार्ड वाटप केले.या मेळाव्यात पोलीस स्टेशन हद्दीतील जवळपास दोनशे नागरिक उपस्थित होते.सदर जनजागरण मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पोलीस उपनिरीक्षक चौधरी व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
*नम्रता फाउंडेशन तर्फे गरजूंना साहित्य वाटप*
येथील मेळाव्यात परिसरातील गरीब आणि गरजू नागरिकांना नम्रता फाउंडेशन नागपूर तर्फे विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.यात 50 साड्या,50 लुंगी,50 प्लास्टिक टोपल्या,40 प्लास्टिक बकेट, शालेय विद्यार्थ्यांना 50 पाण्याच्या बाटल्या, 70 नोटबुक,70 मिनी कंपास आधी साहित्य वाटप करण्यात आले. मिळाव्यात गरीब आणि गरजू सोबतच शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.