भाजयुमो तर्फे कोरची येथे रोजगार मेळावा संपन्न
२२ युवकांना मिळणार रोजगार
कोरची
भारतीय जनता युवा मोर्चा गडचिरोली तालुका कोरची यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने सेक्युरिटी स्किल काँऊसिल इंडिया लिमिडेट तसेच एस आय एसइंडिया लिमिडेट यांच्या माध्यमातून दिनांक २७ एप्रिल ते ३ मे या काळात गडचिरोली जिल्ह्यात सुर क्षा जवान पुरष भरती पदाकरीता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
कोरची येथे ३० एपिलला पार पडलेल्या मेळाव्याचे उदघाटन भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव डाँ शैलेद्र बिसेन तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी अनुसुचित मोर्चा महामंत्री आनंद चौबे तर प्रमुख पाहुणे नगरसेवक गुड्डु अग्रवाल मेघश्याम जमकातन कुरखेडा भाजयुमो अध्यक्ष विनोद नागपुरकर भाजयुमो जिल्हा सचिव अतुल झोडे कुरखेडा तालुका महामंत्री उल्हास देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
सेक्युरिटी स्किल काँन्सिल ऑफ इंडिया आणि एस आय एस इंडिया लिमिटेड तर्फे सुरक्षा जवान पुरुष पदासाठी मेगा भरती घेण्यात येत असुन चौथा भरती मेळावा ३० एप्रिलला कोरची येथे पार पडला .
या मेळाव्यात जवळपास १०० युवकांनी नोंदणी केली त्यात २२युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला.भरती ही भारतीय सुरक्षा दक्षता परिषद नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात आली.
कोरोना महामारी च्या संकटामुळे बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून तरुणांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने एक प्रयत्न भारतीय जनता युवा मोर्चा गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये महामंत्री भारत बावनथडे मधुकर भांडेकर अनिल तिडके अमोल गुड्डेल्लीवार संजय बारापात्रे व भाजयुमो तालुका अध्यक्ष पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. चौथा मेळावा कोरची येथे होऊन जवळपास १०० युवक सहभागी झाले, सहभागी झालेल्या युवकांची चाचणी होऊन २२ युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे, निवड झालेल्या युवकांना प्रशिक्षण करिता निवड आदेश देण्यात आले असुन पुढील ट्रेनिंग करिता गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुका येथुन पहिली टीम दिनांक १० मे ला हैदराबाद येथे प्रशिक्षण साठी उपस्थित राहायचे आहे.
या कार्यक्रमा चे संचालन सुरेश कांटेगे तर आभार गुड्डु अग्रवाल यांनी केले कार्यक्रम यस्ववीतेसाठी एस आय एस कंपनीचे भर्ती अधिकारी निखिल कटरे सुपवायझर भुपेद्र ठाकुर कोरची येथील भारतीय जनता युवा मोर्चा व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विशेष प्रयत्न केले.