गडचिरोली:-गोमणी ते मुलचेरा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डयांचा साम्राज्य निर्माण झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे ताबडतोब दुरुस्ती करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा गोमणी व मुलचेरा सर्व ग्रामस्थांनी मुलचेरा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील गोमणी ते मुलचेरा तालुक्यातील गोमणी ते मुलचेरा मुख्य रस्त्याचे मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. सदर रस्ता हे सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येत असून कित्येक दिवसापासून या रस्त्याचे देखभाल न केल्यामुळे आज तारखेस या पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे.
संपूर्ण बसेस व खासगी वाहन याच मार्गे चालत असून लगाम ते आष्टी मार्ग बंद असल्याने त्या मार्गावरील सर्व वाहने सुद्धा गोमणी ते मुलचेरा मार्गांनीच येत असून वाहनाची रहदारी खूप वाढलेली असून या मार्गावर शाळकरी मुला/मुलीना व क्षेत्रीय ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे या रस्त्यावरून येजा करणाऱ्यास अडचण निर्माण होत आहे. या खड्यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहेत. गंभीर आजाराचे रुग्ण आणि गरोदर मातांना याच रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. १ जुलैपासून नियमित शाळा, महाविद्यालय सुरू झाले असून विद्यार्थ्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होणार होऊ शकतो.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम आलापली ने या गंभीर बाबीची दखल घेऊन तात्काळ गोमणी ते मुलचेरा मुख्य रस्त्याचा चांगल्या दर्जेची गिट्टी व मुरूमचा वापर करून रस्त्यावरील खड्डे बुजवावे तसेच रोलरचा वापर करून सपाटीकरण करून रस्त्याची पूर्णतः दुरुस्ती न झाल्यास दि. 09/ऑगस्ट 2024 ला संविधानिक रित्या चक्का जाम आंदोलन शुक्रवार ला आंबेडकर चौक गोमणी येथे करण्यात करण्यात येणार असून. यात काही अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग राहील. असा इशारा तहसीलदार मूलचेरा सार्वजनिक बांधकाम विभाग आलापली पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मुलचेरा,यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे..