अहेरी: तालुक्यातील लोकसंख्येच्या मानाने तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या छल्लेवाडा या गावात अहेरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल निसार हकीम यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने भेट देऊन समस्या जाणून घेतली.
छल्लेवाडा या गावात मागील अनेक वर्षापासून विविध समस्या उद्भवले आहेत.वेळोवेळी गाववासीयांकडून प्रशासनाला निवेदन देऊनही समस्या सुटत नसल्याने पायरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गावात भेट देऊन विविध समस्या जाणून घेण्यात आले.
यावेळी पहिल्यांदाच गावात कोणीतरी येऊन गावातील समस्या जाणून घेत असल्याने नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात आला. तर पहिली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल निसार हकीम यांनी विविध समस्या शासन दरबारी मांडणार असल्याचे सांगितले.
यावेळी अहेरी तालुका काँग्रेस कमिटीचे राम मुंजमकर,राघोबा गोरकर, गणेश उपलपवार, सत्यनारायण डोंगरे, श्याम कुंभारे,
विनोद गरजेला ,दिवाकर आईलवर, रामचंद्र रामटेके तसेच ग्रामपंचायत सदस्य अशोक झाडे,बुज्जीताई तुर्रेम गावकरी मोबाईल,संतोष भगत, जितेंद्र झाडे, नवीन ताटपल्ली, राकेश आत्राम, बापू गोगुला,नामदेव सुधारी, सुरेखा भगत, लक्ष्मी कोंडा,अर्चना मुंजमकर, सपना आत्राम, मनीषा गोलेरी,देवका जोडे,नागेश गुरुजला, लक्ष्मण रामगुंडम, लक्ष्मी कोंडा कोचीबाई झाडे,कविता आत्राम आदी उपस्थित होते.
*काय आहेत समस्या*
छल्लेवाडा येथील अतिक्रमणधारकांना वन हक्क पट्टे मिळाले नाही. विविध लोक कल्याणकारी व शासकीय योजना पासून येथील नागरिक वंचित आहेत.रेपणपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट छल्लेवाडा गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा देणे. छल्लेवाडा नागरिकांना केवळ शेतीवरच अवलंबून राहाव लागते. त्यामुळे सिंचनाची सुविधा करून देणे. छल्लेवाडा गावाची लोकसंख्या लक्षात घेऊन गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करणे.गावात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण उपलब्ध करून देणे. रेपनपल्ली – गुंडेरा गावाजवळ प्रसिद्ध तीर्थक्षेत्र लखामेडा पर्यंत पक्का रस्ता मंजूर करणे व त्याचे डेव्हलपमेंट करणे.तसेच जोगनगुडा येथील पाण्याची समस्या दूर करणे.आदी समस्या गावकऱ्यांनी मांडली.