वरोरा:- वरोरा तालुक्यात होत असलेले अवैध धंदयांना आळा घालण्यासंबंधी डॉ. अंकुश आगलावे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष केंद्रीय मानाधिकार संगठन, नवी दिल्ली यांनी मा. पोलीस अधिक्षक व मा.जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना निवेदन देवून कार्यवाही करण्याची मागणी केलेली आहे.
मागील अनेक दिवसांपासून वरोरा तालुक्यात व शहरात अवैध धंदयांना ऊत आलेला आहे. सद्यःस्थिती क्रिकेटचा सट्टा मोठया प्रमाणात गाजत आहे. दररोज लाखो रूपयांची उलाढाल क्रिकेटच्या सट्टयाव्दारे होत आहे. शहरातील तरूण पिढी सट्टयाच्या आहारी गेलेले आहे.
तसेच सुगंधित तंबाखु, गुटखा इगल, हुक्का असे प्रकारचे वस्तु मोठया जोरात विक्री होत आहे. याच बरोबच अवैध रेती तस्करी मोठया प्रमाणात होत आहे. वरोरा शहरात होत असलेल्या अवैध धंदयांना आळा घालण्याची मागणी यावेळी केली आहे.