वरोरा :- उप-प्रादेशिक व्यवस्थापक एकोना-1 मधील अरुणोदय कोल एजन्सीच्या व्यवस्थापकाकडून योग्य ती कारवाई केली जात नाही. 24 मार्च रोजी झालेल्या बैठकीत अरुणोदय कोल इजेन्सी कोणताही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. उपक्षेत्र व्यवस्थापकांनी एक आठवड्याची मुदतवाढ मागितली आणि आठवडाभरात अरुणोदय कोल एजन्सीसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. आज एक महिना उलटला तरी बैठक आयोजित केली नाही. मात्र अरुणोदय कोल एजन्सीने रस्ता खराब झाल्याचा बहाणा करून ३४ कामगारांना कामापासून रोखले आहे. त्याची पूर्वकल्पना विदर्भ श्रमिक निधीने व्यवस्थापनाला दिली होती परंतु अरुणोदय कोल एजन्सीवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरला असून काढलेल्या त्या ३४ कामगारांना येत्या १७ तारखेपर्यंत कामावर घ्यावे अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा विदर्भ हेवी अँड लाईट मोटर ड्रायव्हर युनियन यांनी वेकोली प्रबांधकांना दिला आहे .
दिनांक 03 मे रोजी जी एम कार्यालय, कुचना कार्यालयात. महाव्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली कामगारांची बैठक झाली. महाव्यवस्थापकांनी समस्या सोडविण्यासाठी चार दिवसांची मुदत दिली होती. मात्र आजतागायत चर्चा झाली नाही अथवा प्रश्न सुटला नाही. ०३ मे च्या बैठकीत उपप्रादेशिक व्यवस्थापक एकोना देखील उपस्थित होते.
अरुणोदय कोल एजन्सीवर कोणतीही कारवाई करण्यास व्यवस्थापन तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कामगारांना संपाचा निर्णय घ्यावा लागत आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी व्यवस्थापनाची असेल, ही पूर्व माहिती समजावी. अरुणोदय कोल एजन्सीसोबत २४ तासांच्या आत बैठक आयोजित करण्याची विनंती केली आहे निवेदनाद्वारे कामगारांनी केली आहे .
अरुणोदय कोल एजन्सी ने कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता ३४ कामगारांना कामावरून कमी केले . ही हुकूमशाही आहे या विरोधात कामगारांनी बंड पुकारला असून मी कामगारांच्या पाठीशी आहो . कामगारांना न्याय मिळे पर्यंत मी कामगारांसोबत राहील.
डॉ . अंकुश आगलावे
विदर्भ प्रदेश अध्यक्ष
मानवाधिकार संघटन दिल्ली