गोंडपिपरी -(सुरज माडूरवार)
नगरपंचायत गोंडपिपरीच्या तीन विषय समिती सभातींची गुरुवारी (दि २२) बिनविरोध निवड झाली.पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार शुभम बहाकर, मुख्यधिकारी जाधव यांनी काम पाहिले.
सभापतींचा कार्यकाळ एक वर्षाचा असतो.त्यांचा कार्यकाळ संपल्याने गुरुवारी सभा झाली.सभेत शिवसेना(उबाठाचे) यादव बांबोडे यांची स्वच्छ्ता व आरोग्य, काँग्रेसच्या रंजना रामगिरकर बांधकाम,काँग्रेसच्या वनिता वाघाडे बालकल्याण समितीचे सभापती पद देण्यात आले.