नव्याने रुजू झालेले ठाणेदार अवैध धंद्यांविरुद्ध ॲक्शन मोडवर
गोंडपिपरी – (सुरज माडूरवार )
गौण खनिजाची अवैध वाहतूक करताना गोंडपिपरी तालुक्यातील रारापेठ येथील शिवारात दि.(२१)बुधवारी ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी सकाळी तीन वाजताच्या सुमारास तीन ट्रॅक्टर जप्त करत कारवाई केली.
ठाणेदार हत्तीगोटे हे गोंडपिपरी येथे नव्याने रुजू झाले. रुजू झाल्यानंतर ठाणेदार ॲक्शन मोड वर येत अवैध धंद्याविरोधात कारवाईचा सपाटा लावला आहे.
रेतीची अवैध वाहतूक करताना तीन ट्रॅक्टर जप्त करून गुन्हे नोंद केले.बुधवारीच शहरातील जय सेवा चौकात जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच धाड टाकून ७ जुगार खेळणाऱ्याना ताब्यात घेत गोंडपिंपरी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.
एकीकडे पोलीस विभाग कारवाई करताना दिसत आहे तर महसूल विभागाला रेती तस्करीची माहिती न मिळणे हे शंकास्पद असून महसूल विभागावर ताशेरे ओडल्या जात आहे.
ठाणेदार रमेश हत्तीगोटे नव्याने रुजू होतात अवैद्य धंद्यांविरुद्ध ॲक्शन मोडवर येत मागील आठवड्यात तेलंगणात कत्तलिसाठी नेणाऱ्या ३२ जनावरांची सुटका केली होती.आता रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.