गोंडपिपरी पोलिसांची धडक कारवाई
गोंडपिंपरी – (सुरज माडूरवार)
गोंडपिपरी तालुका हा उद्योग विहिरीत असल्याने येथे बेरोजगारांचा मोठा फौज फाटा आहे.अनेक बेरोजगार अवैध धंद्यात उतरले आहे तालुक्यात अवैध धंदे फोफावले आहे.तालुक्यातील जोगापुर येथे गुप्त माहितीच्या आधारावर नव्याने रुजू झालेले ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी धाड टाकून १४८ बनावट दारूच्या पेट्या जप्त केल्याने एकच खळबळ उडाली.
गुप्त माहितीच्या आधारावर ठाणेदार हत्तीगोटे यांनी सहकारी पोलीस सुरपाम,कोवे,नैताम यांना सोबतीला घेत जोगापुर येथील गुरुविंदरसिंग तेजसिंग डांगी वय (२२) यांनी बनावट दारू ठेवलेल्या शेतशिवरातील दि.(२१) बुधवारी झोपडीत धडक देत चौकशी केली.चौकशी दरम्यान १४८ देशी विदेशी बनावट दारू साठा सापडला.घटनास्थळी पंचनामा करून पाच लाख अठरा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा नोंद करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटल्यानंतर पहिल्यांदाच गोंडपिपरीत एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला.