अहेरी:-तालुक्यातील छल्लेवाडा येथे हरिजन वस्ती रस्त्यावर मोठ्या स्लॅब कालवटचे बांधकाम केले जाणार असून नुकतेच मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न झाले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम,माजी प स सदस्य हर्षवर्धन आत्राम,राकॉचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राकॉचे जेष्ठ कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार,सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार,संदीप रेपालवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छल्लेवाडा हे गाव अहेरी तालुक्यात लोकसंख्येच्या मानाने तिसऱ्या क्रमांकावर असून विखुरलेला आहे.याठिकाणी गावातून वाहणाऱ्या नाल्यांमुळे परिसरात पाणी साचत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.अंतर्गत रस्ते आणि कालवटचे काम केल्यास नागरिकांना दिलासा मिळणार असल्याने कालवट बांधकाम करण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी तब्बल ३० लाखांची निधी मंजूर केली आहे.
नुकतेच या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून १७ फेब्रुवारी रोजी यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.यावेळी परिसरातील नागरिकांनी मंत्री महोदय सोबत संवाद साधत गावातील समस्यांवर चर्चा केली.लगेच मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.