अहेरी: अहेरी विधानसभा क्षेत्रातील मोयाबिनपेठा सह विविध गावात व्हॅलीबॉल व क्रिकेट खेळाचा मोठा क्रेज आहे.मागील अनेक वर्षांपासून या दोन्ही खेळांना विशेष महत्व देत दरवर्षीच याठिकाणी स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.अहेरी विधानसभा क्षेत्रात तर क्रिकेट स्पर्धेची गेली अनेक वर्षांपासून परंपरा सुरू असून या विधानसभा क्षेत्रातून भविष्यात उत्कृष्ट खेळाडू घडतील असा आशावाद मा. बि.आर.एस. नेते, माजी आमदार, अहेरी विधानसभा क्षेत्र तथा विभागीय अध्यक्ष आविस दिपक आत्राम यांनी व्यक्त केल्या.
१७ फेब्रुवारी रोजी मोयाबीनपेठा येथे आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरजी रत्नम उपसरपंच मोयाबीनपेठा, प्रमुख पाहुणे म्हणून सिरकोंडा ग्राम पंचायत चे सरपंच लक्ष्मणजी गावडे, नरसय्यापल्ली चे उपसरपंच व्येंकटी दुर्गम, आवलमरी-व्येकटापुरचे माजी सरपंच व्येंकन्नाजी कोंडापे, मोयाबीनपेठा चे माजी उप सरपंच व्येंकन्नाजी तोडसाम, आवीस सल्लागार वाईल तिरुपतीजी, विजय रेपालवार, समय्या दुर्गे, स्वामी जाकावार, व्येंकन्नाजी जाकावार, इंदाराम ग्राम पंचायतचे सदस्य शाकिर शेख, आवीस कार्यकर्ते व्यंकटस्वामी रामटेके, आनंदरावजी, अशोक तलाडे, गणपत डुकरे, गायकवाडजी, रमेश अन्ना, आनंद कोटा, मिलिंद अलोने, जुलेख शेख, विनोद कावेरी, रुपेश दुर्गे, रवी कुम्मरी, महेश बोरकुट, सागर दुर्गे, राजेश कावरे, रुपेश बोरे, तसेच भारत राष्ट्र समिती व आविसचे कार्यकर्ते आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
पुढे बोलताना मोयाबीनपेठा असो अथवा अहेरी विधानसभा क्षेत्रातील कुठल्याही खेळांचे आयोजन असू द्या लगतच्या छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातून चांगले खेळाडू सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ दाखवतात.त्यामुळे येथील खेळाडूंना त्याचा मोठा फायदा होतो.त्यामुळे असे मोठे स्पर्धा आयोजन केले पाहिजे.त्यासाठी आपण नेहमीप्रमाणे दरवर्षी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी म्हटले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरजी रत्नम उपसरपंच मोयाबीनपेठा यांनी उत्तम असे मार्गदर्शन करून खेळाडूंसोबतच आयोजकांनाही होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३० हजार १०१रुपये,व द्वितीय पारितोषिक २० हजार १०१ रुपये तर तृतीय पारितोषिक हे,१०,हजार १०१ रुपये अशी रोख रक्कम दिले,आणि आकर्षक शिल्ड देण्यात येणार आहे.या स्पर्धेच्या उदघाटनिय सामन्यात दिपक आत्राम यांनी स्वतः मैदानात उतरून जोरदार फटकेबाजी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि युवा खेळाडू मध्ये स्फूर्ती निर्माण केली.