वर्धा प्रतिनिधी -:मागील पंधरा दिवसांत कम्युनिस्ट माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात दिनेश गावडे,लालू वेडदा,रामजी आत्राम या तीन आदिवासी बांधवांच्या निर्घृण हत्या केल्याचा जाहीर निषेध करीत विवेक विचार मंच वर्धा ने जिल्हाधिकार्याच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना कम्युनिस्ट माओवादी गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व माओवाद आणि माओवादी यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा या संदर्भात निवेदन दिले.
संविधान विरोधी कम्युनिस्ट माओवाद्यांनी हातात शस्त्र, दारूगोळा घेवून अनेक हत्याकांड घडवत हजारो पोलीस जवानांच्या हत्या,शेकडो दलित-आदिवासी नागरिकांच्या हत्या केल्या आहेत. पिडीत गरीब कुटुंबीयांना सरकार ने आर्थिक मदत करावी,संरक्षण द्यावे व नोकरी द्यावी आणि माओवाद्यांवर अत्यंत कठोर आणि दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी विवेक विचार मंच चे प्रांत समन्वयक अतुल शेंडे यांनी केली तसेच शासनाने या अत्यंत गंभीर विषयाकडे जातीने लक्ष देवून महत्वपूर्ण पाऊले उचलली नाही तर भविष्यात विवेक विचार मंच आपल्या आदिवासी बांधवांच्या संरक्षणार्थ तीव्र आंदोलन करेल असा इशारा जिल्हा संयोजक राहुल मुन यांनी दिला. याप्रसंगी विवेक विचार मंच चे जिल्हा संपर्क प्रमुख डॉ.निशिकांत चिकटे,अमित भित्रे,वैभव वागदे, प्रशांत अवचट,गजू बोरजे,प्रवीण दडमल आदी कार्यकर्ते हजर होते.