लहान (आर्वी)/ वर्धा :- स्थानिक लहान आर्वी येथे दरवर्षीप्रमाणे दीपावली पाडव्याला मातृसेवा समितीचा सहावा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शोभा गावनेर तर प्रमुख पाहुणे अमरावती शहर गाडगेनगर पोलिस स्टेशनचे पीएसआय अजय ढाकुलकर, लहान आर्वी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच सुनील साबळे, मातृसेवा समितीचे अध्यक्ष प्रीतम गायकी, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक मोहन खारकर आणि सहाय्यक शिक्षिका वर्षा आकोलकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी यावर्षीचा मातृसेवा शिक्षक सन्मान वर्षा आकोलकर यांना बहाल करण्यात आला. सुनील साबळे यांनी पुन्हा सरपंचपद प्राप्त केल्याबद्दल, आजपर्यंत गावासाठी केलेल्या कार्यासाठी त्यांना ग्रामभूषण सन्मान बहाल करण्यात आला. सोबतच शासकीय सेवेत प्रवेश केल्याबददल छत्रपती रामरावजी होले यांना सन्मानित करण्यात आले. मातृसेवा शिष्यवृत्ती दहावीत गावातून प्रथम आलेल्या स्वरूप गजानन देशमुख व बारावीत प्रथम मंथन विजय होले यांचा सत्कार करण्यात आला. सर्व शालेय विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी म्हणून मनिबँक भेट करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य मारोती उईके, अमोल होले, सागर नागापुरे, ज्योती गायकी, कुसुम सरदार, कांता इंगोले, सोनाली राऊत, भाग्यश्री निंभोरकर, रेश्मा माथने यांचा गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला. शेवटी मागील एक वर्षात गावातील मरण पावलेल्या सर्व व्यक्तींना सामूहिकपणे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन अंकुश गाडगे यांनी तर प्रास्ताविक मातुसेवा समितीचे संस्थापक विजय ढाकुलकर यांनी केले. आभार किशोर देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी नंदकिशोर कनेर, सुधाकर मख, आनंद पंचगडे, मनोज मख, अविनाश ढाकुलकर यांनी विशेष प्रयत्न केले.