अहेरी:- राजाराम आहेरी तालुक्यातील राजाराम येथे धान खरेदी केंद्राची मागणी प्रलंबित होती. यामध्ये विविध समस्या निर्माण होत होत्या. अखेर माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकारातून या धान खरेदी केंद्राचा मार्ग मोकळा झाला. नुकतेच राजाराम येथे धान खरेदी केंद्राचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
परिसरातील सुमारे १५ गावांना धान विक्रीसाठी कमलापूर येथील केंद्रावर जावे लागत असते. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना खुप अडचणी येतात. खुप वर्षापासून राजाराम येथे धान खरेदी केंद्राची मागणी प्रलंबित होती. बऱ्याच तांत्रीक बाबींच्या मुद्यावर मागणी पूर्ण होत नव्हती.परंतु राजे अम्ब्रीशराव महाराजांनी पालकमंत्री असताना जोर लावून धान खरेदी केंद्राला मंजुरी मिळवून दिली होती. परंतु, महसूल आणि वनविभागाकडे सोयीची जागा उपलब्ध नसल्याने पुन्हा जागेचा प्रश्न उभा ठाकला. गावकऱ्यांनी एकत्र येवून पुढाकार घेतला व एक मोक्यावरची खासगी जागा खरेदी करून धान खरेदी केंद्रासाठी शासनाला ऊपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. परंतु समस्या सुटण्याचे नावच घेईना, जमीन मालकाला पैशाची तातडीची गरज भासली आणि गावकऱ्यांकडे पुरेशी रक्कम जमा झाली नव्हती त्यामुळे जमिनीचा व्यवहार फिसकटण्याची स्थिती निर्माण झाली. कमी वेळात मोठी रक्कम गोळा करणे परिसरातील शेतकऱ्यांसाठी अशक्यप्राय होते.
शेवटी सरपंच आणि गावातील धाव घेतली. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी समस्येचे गांभीर्य ओळखून सढळ हस्ताने आर्थिक हातभार दिला. त्यामुळे धान खरेदी केंद्रासाठी मोठा अडसर दूर झाला. या खरेदी केंद्राचे भूमिपूजन सुद्धा राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्याच हस्ते व्हावे ही नागरिकांची इच्छा होती. नागरिकांच्या विनंतीला मान देऊन राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी निमंत्रण स्विकारले व उत्साहात राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.
राजाराम ग्रा.पं. क्षेत्रातील राजाराम, सुरायपल्ली, कोंकापार व खांदला ग्रा.पं. क्षेत्रातील खांदला, पत्तीगाव, कोत्तागुडम, चिरेपल्ली, मरनेली, रायगट्टा, गोल्लाकर्जी आणि तिमरम ग्रामपंचायत क्षेत्रातील तिमरम, गुड्डीगुडम, मदतीसाठी राजे विस्लम आदी गावांना धान केंद्राचा होईल. यापूर्वीही पालकमंत्री असतांना राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी यापरिसरात रस्त्यांचे जाळे विणले, पूल बांधुन शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहोचवला. आता धान खरेदी केंद्राच्या सर्व समस्या मार्गी लावून शेतकऱ्यांचे खरे कैवारी बनले. याप्रसंगी सरपंच सुमन आलाम, पं. स. माजी सभापती रविना गावडे, पं.स. माजी सभापती भास्कर तलांडे, माजी सरपंच विनायक आलम, माजी सदस्य सूर्यकांत आत्राम, जेष्ठ कार्यकर्ता मुत्ता पोरतेठ, नारायण कम्बगीनीवार, कम्बगीनीवार, सुभाष मारगोनवार, राकेश कम्बगौनिवार, व्यंकटेश मडावी, अनिता आलम, अरविंद परकिवार, वसंत सिडाम यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.