चंद्रपूर : – जनतेची अविरत सेवा हा मूलमंत्र राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवातीपासून तर आतापर्यंत सातत्याने जपला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आतापर्यंतच्या विकास कार्याच्या झंझावाताला चंद्रपुरातील महिलांनी शुभेच्छा पत्रांच्या माध्यमातून सलाम केला आहे.
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्फत विकासाची अगणित कामे झाली आहेत. केवळ चंद्रपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी विकासाची गंगा प्रवाहित केली आहे. त्याला अनुसरून जिल्हा परिषद क्षेत्र तालुका चंद्रपूर येथील भाजप महिला आघाडीतर्फे सुधीरभाऊंना वाढदिवसानिमित्त १ हजार शुभेच्छापत्र व धन्यवाद पत्र देण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधत हे शुभेच्छा व आभार पत्र ना. सुधीर मुनगंटीवार यांना महिलांनी दिले.
जिल्ह्यातील विकासाच्या बाबतीत ना. श्री. मुनगंटीवार यांचे सहकार्य सतत मिळत असते, असे नमूद करीत महिलांनी सुधीर भाऊंच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता व्यक्त केली. ना. मुनगंटीवार यांच्या शब्दकोशात ‘नाही’ हा शब्दच नसून जिल्ह्यातील माता-भगिनींच्या पाठीशी ते नेहमी उभे असतात, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. रोशनी अन्वर खान माजी सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर, अनिता भोयर तालुकाध्यक्ष, केमा रायपुरे माजी सभापती पंचायत समिती चंद्रपूर, लक्ष्मी सागर मीडिया प्रमुख, रंजना किनाके आदिवासी आघाडी अध्यक्ष, गीता वैद्य माजी सरपंच, पांडे ताई व महिला आघाडीतर्फे शुभेच्छा व धन्यवाद पत्र ना. श्री. मुनगंटीवार यांना देण्यात आले. चंद्रपूर तालुक्यातील एक हजार महिलांनी हा अभिनव उपक्रम राबवला.
विविध क्षेत्रांत केलेली विकास कामे याशिवाय कोरोना काळातील मदत धान्य किट, मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, कोविड वॅक्सिन उपलब्ध करून दिले, सभागृह बांधकाम, व्यायाम शाळा बांधकाम, खुल्या जागा विकसित करून ओपन (ग्रीन) जिमचे साहित्य उपलब्ध करून दिले, गावांतर्गत सी.सी. रोड, ताडोबा मुख्य रस्त्यावरील डिव्हायडरला इलेक्ट्रिक पोल व वृक्षारोपण, पाण्याच्या टाकीचे बांधकाम इत्यादी विकास कामांसाठी आभार मानायचे म्हणून धन्यवाद पत्र ना. श्री. मुनगंटीवार यांना देण्यात आले. याशिवाय भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामपाल भैया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रम, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजनही ना.श्री. मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले.