वरोरा :- चंद्रपूर जिल्हा बास्केटबॉल समिती आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे दि.25 आणि 26 तारखेला आनंद निकेतन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा.तानाजी बायस्कर उपस्थित होते
या स्पर्धा दोन वयोगटांमध्ये घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये 18 वर्षाखालील (मुले,मुली) आणि 18 वर्षावरील (मुले ,मुली).18 वर्षा खालील मुले या वयोगटांमध्ये एसबीऐ वॉरीअर सिंदेवाही या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर एसबीऐ ऑल स्टार ज्युनिअर सिंदेवाही या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. 18 वर्षाखालील मुली या वयोगटामध्ये एसबीऐ वॉरीअर सिंदेवाही या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तसेच सीबीए
गर्ल्स,चंद्रपूर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे वरिष्ठ गट मुलांमध्ये सीबीए टायगर, चंद्रपूर या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तसेच आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. वरिष्ठ गट मुलींमध्ये एसबीऐ ऑल स्टार ज्युनिअर सिंदेवाही या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तसेच आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.संपूर्ण संघाच्या खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकूण 17 संघातील 68 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचे पंच म्हणून मार्टिन, प्रणव शर्मा, दाईमाई, अल्बम संगमा यांनी जबाबदारीने आपली भूमिका बजावली.या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचा राष्ट्रीय खेळाडू गणराज हेपट याच्या नेतृत्वाखाली प्रा.तानाजी बायस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण खेळाडूंनी केले.