घुग्घुस :- येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात रविवार, २६ मार्च रोजी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, घुग्घुस शहरातील प्रत्येक बुथवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध शासकीय योजना व विविध अभियानाचा संदेश सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचत आहे. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला आहे.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे अमोल थेरे, सुनील बाम, नितीन काळे, अंजु इरगुराला, गणेश बोबडे, श्रीकांत बहादूर, सुशील डांगे, राजू चौधरी, सौरभ बोबडे, आशिष दातारकर, महेंद्र जेनेकर, अमोल हिरादेवे, प्रवीण मोहितकर उपस्थित होते.