गोंडपिपरी :-तालुक्यातील करंजी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने येत्या रविवारी (दि.५) शाळेतील आजी-माजी विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.येथिल जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत असतांना दिसतात.चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यासह ईतरही भागात विखूरलेल्या या माजी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.यानंतर रात्रीच्या दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देखील ठेवण्यात आली आहे.कार्यक्रमाला करंजी शाळेचे माजी विद्यार्थी असलेले राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा ब्रम्हपूरीचे आमदार विजय वडेट्टीवार हे अध्यक्ष म्हणून असणार आहेत.तर राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे कार्यक्रमाचे उद्घाटन करतील.प्रमुख अतिथी म्हणून गोंडपिपरीचे तहसीलदार के.डी.मेश्राम,संवर्ग विकास अधिकारी शालिक माऊलीकर,गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू,विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता अरविंद कातकर,सरपंच सरिता पेटकर,तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप वासेकर,शाळा समितीचे अध्यक्ष मारोती जुवारे आदींची उपस्थिती असणार आहे.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक सुनील कोहपरे,शाळा समितीचे अध्यक्ष मारोती जुवारे यांनी केले आहे.