– स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा एक हात मदतीचा –
भद्रावती = तालुक्यातील मुधोली येथील तरुण शेतकरी कैलास भाऊराव दडमल ३५ वर्षे यांनी शेतातील सततची नापिकी, वाढलेले कर्ज आणि जंगली प्राण्यामुळे होणारे शेत पिकांचे नुकसान यामुळे दि. २० आँक्टोंबर रोजी शेतात विष प्राशन करुन आत्महत्या केली. त्याच्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर चे कर्ज होते.
आज दि. २२ रोजी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांच्या सांत्वनपर भेटीने मुधोलीचे दडमल कुटुंबिय अक्षरश : गहिवरले. अवघ्या पस्तीस वर्षाचा कमावता पुरुष अचानक अशा प्रकारे निघुन गेल्याने संपूर्ण दडमल कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. याप्रसंगी रविंद्र शिंदे यांनी स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत दडमल कुटुंबियांना आर्थीक मदत केली.
याप्रसंगी कैलासची आई भागेरथाबाई, पत्नी मंगला, भाऊ विठ्ठल, विवाहित बहिणी माया, मंगला व अनुसया , भाऊजी बबन घरत , केशव गराटे व भास्कर वाकडे तसेच काका वासुदेव दडमल उपस्थित होते. कैलासची आठवण आणि सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी दाखविलेली सांत्वना तसेच आर्थीक मदत यामुळे संपूर्ण दडमल कुटूंब गहिवरले . या भावनाशील प्रसंगी सर्व उपस्थीतांचे डोळे अक्षरश : पाणावले.
आज दि. २२ ऑक्टोंबर रोजी स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रविंद्र शिंदे आष्टा येथे क्रिकेट सामन्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी मुधोलीचे सरपंच बंडू पा. नन्नावरे यांनी कैलास दडमल यांच्या आत्महत्या विषयीची माहिती रविंद्र शिंदे यांना दिली. रविंद्र शिंदे यांनी यानंतर दडमल कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेतली.याप्रसंगी तुळशीराम श्रीरामे, बंडू पा नन्नावरे, मारोती गायकवाड, पंडित पाटील कुरेकार, शंकरराव गायकवाड , सोमेश्वर पेदांम व गावकरी मडळी आणि आप्त परिवार यांची उपस्थित होती.