वरोरा (सय्यद मोहसीन ) :- येथे जश्ने ईद मिलादुन्नबी च्या पर्वा वर १७ ऑक्टोबरला खास विद्यार्थ्यासाठी मोटीवेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्या साठी पुढील वाटचाली साठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात डॉ.समरीन जबीर शेख , क्लिनिकल साइकोलॉजी पुणे, आयशा साबिर शेख बी. एच .एम. एस. (नाशिक),मुस्कान खालिक शेख बी.एच. एम. एस. (औरंगाबाद), शाहेबाज खा इकबाल खा बी.एच.एम.एस. (खामगाव), सानिया इकबाल शेख बी.एच.एम.एस (औरंगाबाद) ,तोसीफ बाबा शेख बीएचएमएस (नागपुर), कामिल नुरुल सय्यद १२वी , सानिया सोहेल बादामी १२ वी, फिजा युनुस पठान १२ वी, अहमद नजमुलहुदा सय्यद १०वी या प्राविण्य श्रेणीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात समीर अहमद सिद्दीकी आय ए एस कोच ,फाउंडर अलिफ अकॅडमी दिल्ली यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले.
शालेय अभ्यासासोबत स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी ,कोणत्या कोणत्या विषयाचा अभ्यास करावा ,एकाग्रतेने अभ्यासात सातत्य ठेवत ध्येय सहज साध्य करता येईल असे आय ए इस कोच (IAS coach) समीर अहमद सिद्दीकी यांनी सांगितले.