गोंडपिपरी(सुरज माडुरवार) :- जुन्या वादातून वृद्धावर चाकूने हल्ला करून ठार केल्याची खळबळजनक घटना आज दि.(१२ ) बुधवारी सकाळच्या सुमारास गोंडपीपरी तालुक्यात घडली.गोंडपिपरी तालुकाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दरुर येथील किसन बाघू वराते वय (७५) यांच्यावर वैयक्तिक जुन्या वादावरून मोरेश्वर गिरमा भोयर वय (४५) यांनी धार धार चाकूने हल्ला करून सकाळी ९ वाजताच्या दरम्यान गंभीर रित्या जखमी केले.घटनेची माहिती मिळताच ठाणेदार जीवन राजगुरू ,पीएसआय पटले यांनी सहकऱ्यांसह घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. किसन वराते यांना उपचारासाठी गोंडपिपरी वरून चंद्रपूर नेताना वाटेतच कोठारी जवळ प्राणज्योत मावळली.आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर करणार असून पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करत आहे